उन्हाळ्याच्या दिवसात सर्वांच्याच घरी पापड, चकल्या बनवल्या जातात. पापड खायला कुरकुरीत आणि बनवायला एकदम सोपे असतात. एकदा हे पापड बनवले की वर्षभर टिकतात आणि भूक लागल्यानंतर कधीही खाता येतात. (Instant Batata Papad Recipe) बटाट्याच्या चकल्या, उडदाचे पापड, कुरडया असे बरेच पदार्थ उन्हाळ्याच्या दिवसात केले जातात. त्यापैकी सर्वात सोपे हे बटाट्याचे पापड असतात. कारण बनवायला जास्त वेळ लागत नाही. (How to Make Instant potato papad)
1) सगळ्यात आधी बटाटे स्वच्छ धुवून उकडून घ्या. नंतर बटाट्याच्या किसमध्ये तेल घालून हे मिश्रण एकजीव करून घ्या.
2) त्यात चिली फ्लेक्स, मीठ, मसाला, जीरं आणि २ चमचे तेल घालून पुन्हा एकजीव करून घ्या. हाताला तेल लावून या पिठाचे गोळे बनवा.
3) एका प्लास्टिकच्या कागदावर पसरवून घ्या. १ ते २ दिवस सुकवल्यानंतर हे पापड तळून पाहा. तयार आहेत बटाट्याचे पापड