Lokmat Sakhi >Food > डाळ शिजली नाही तरी चालेल, करा १ चमचा बेसनाचे सांबार, चमचमीत झटपट रेसिपी खास थंडीसाठी

डाळ शिजली नाही तरी चालेल, करा १ चमचा बेसनाचे सांबार, चमचमीत झटपट रेसिपी खास थंडीसाठी

Instant besan sambar recipe, Kadalai mavu sambar : साउथ इंडियन चवीचा सांबार तयार करायचंय, ते ही इन्स्टंट? मग एकदा ही रेसिपी पाहाच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2024 02:00 PM2024-01-04T14:00:27+5:302024-01-04T14:01:16+5:30

Instant besan sambar recipe, Kadalai mavu sambar : साउथ इंडियन चवीचा सांबार तयार करायचंय, ते ही इन्स्टंट? मग एकदा ही रेसिपी पाहाच..

Instant besan sambar recipe, Kadalai mavu sambar | डाळ शिजली नाही तरी चालेल, करा १ चमचा बेसनाचे सांबार, चमचमीत झटपट रेसिपी खास थंडीसाठी

डाळ शिजली नाही तरी चालेल, करा १ चमचा बेसनाचे सांबार, चमचमीत झटपट रेसिपी खास थंडीसाठी

नाश्ता किंवा जेवणामध्ये प्रत्येक जण दाक्षिणात्य पदार्थ आवडीने खातो. या पदार्थांमुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. शिवाय वजन कमी करण्यास मदत मिळते. इडली, डोसा, मेदू वड्यासह सांबार आणि चटणी खाल्ली जाते. गरमागरम सांबारसोबत फक्त इडली, डोसा नसून चपाती आणि भात देखील खायला उत्तम लागते. सांबार (Sambar) सहसा तुरडाळ, शेवग्याच्या शेंगा, कांदा, वांगी, भोपळ्याचा वापर करून तयार केले जाते.

पण आपण कधी बेसन सांबार करून पाहिलं आहे का? डाळींचा सांबार करण्यात वेळ तर जातोच, शिवाय त्यात एक जरी जिन्नस नसेल तर, सांबारची चव बिघडते (Cooking Tips). पण जर आपल्याकडे वेळ नसेल शिवाय झटपट सांबार तयार करायचं असेल तर. एकदा बेसन सांबार करून पाहा. चटकदार पौष्टीक रेसिपी तयार होईल काही मिनिटात(Instant besan sambar recipe, Kadalai mavu sambar).

बेसन सांबार करण्यासाठी लागणारं साहित्य

टोमॅटो

कांदा

तेल

मोहरी

लाल सुक्या मिरच्या

हिरवी मिरची

मुलाखत देताना त त प प होते? ३ सोप्या गोष्टी, नोकरीसाठी सिलेक्शन होणारच

हळद

सांबार पावडर

मीठ

बेसन

गुळाची पावडर

हिंग

कोथिंबीर

कृती

सर्वप्रथम २ टोमॅटो चिरून घ्या. नंतर एका कढईत २ चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा मोहरी, २ लाल सुक्या मिरच्या, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कढीपत्ता आणि ७ ते ८ लहान आकाराचे अख्खे कांदे घालून परतवून घ्या. नंतर त्यात चिमुटभर हळद, एक चमचा सांबार पावडर, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेला टोमॅटो घालून परतवून घ्या.

एलपीजी गॅस बचत करण्याच्या ५ खास टिप्स 

कांदा आणि टोमॅटो लालसर झाल्यानंतर त्यात एक ग्लास पाणी घाला. १० मिनिटांसाठी मध्यम आचेवर गॅस ठेवा. दुसरीकडे एका बाऊलमध्ये एक चमचा बेसन घ्या, त्यात २ चमचे पाणी घालून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट सांबारमध्ये ओतून मिक्स करा.

नंतर त्यात एक चमचा गुळाची पावडर, चिमुटभर हिंग आणि कोथिंबीर भुरभुरून मिक्स करा. एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करा. अशा प्रकारे चमचमीत गरमागरम सांबार खाण्यासाठी रेडी. आपण सांबारचा आनंद वाफाळलेला भात, इडली, डोसा किंवा चपातीसह लुटू शकता.

Web Title: Instant besan sambar recipe, Kadalai mavu sambar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.