सकाळच्या नाश्त्याला किंवा मधल्यावेळेत भूक लागल्यानंतर काय खावं ते पटकन सुचत नाहीत. सकाळच्या नाश्त्याला खाण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ ट्राय करू शकता. पटकन जमेल आणि खायला आवडेल असे पदार्थ तुम्ही घरच्याघरी झटपट बनवू शकता. (How To Make Bred Upma)
अनेकदा फ्रिजमध्ये उरलेले ब्रेड ठेवलेले असतात. (How To Make Bread Upma) या ब्रेडपासून तुम्ही वेगवेगळे पदार्थ बनवू शकता. (How To Make Instant Bread Dosa) जसं की ब्रेडचा उपमा, ब्रेडचा डोसा. ब्रेडचा डोसा करण्यासाठी तुम्हाला डाळ दळा, डाळ भिजवा ही झंझट करावी लागणार नाही. अगदी कमीत कमी वेळात हा डोसा बनून तयार होईल. (Cooking Hacks & Tips)
ब्रेडचा झटपट डोसा कसा करायचा?
1) ब्रे़डचा डोसा करण्यासाठी सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यात ६ ते ७ ब्रेडचे तुकडे घाला. या तुकड्यांचा बारीक चुरा करून एका भांड्यात काढून घ्या.
2) त्यात २ चमचे तांदूळाचे पीठ, २ चमचे रवा, १ चमचा मिरचीचे तुकडे घाला. नंतर त्यात लसणाचे बारीक तुकडे, जीरं, चिली फ्लेक्स, ऑर्गेनो, मीठ, कोथिंबीर आणि पाणी घालून चमच्याच्या साहाय्याने ढवळून घ्या.
3) एका पॅनला तेल लावून त्यावर चमच्याच्या साहाय्याने हे पीठ घाला. चमच्याने हे पीठ व्यवस्थित ढवळून घ्या. पॅनला तेल लावून त्यावर चमच्याच्या साहाय्याने हे मिश्रण व्यवस्थित पसरवून घ्या.
4) त्यावर पीठ घालून डोसा व्यवस्थित शिजू द्या. त्यानंतर डोसा चमच्याच्या साहाय्याने पलटवा. तयार आहे गरमागरम ब्रेडचा डोसा. हा डोसा तुम्ही खोबऱ्याची चटणी, टोमॅटोची चटणी, सांबार किंवा कोणत्याही भाजीबरोबर खाऊ शकता.
ब्रेडचा उपमा कसा करायचा? (Bred Upma Recipe)
ब्रेडचा उपमा करण्यासाठी सगळ्यात आधी ब्रेडचे ९ ते १० स्लाईज घ्या. तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त स्लाईज घेऊ शकता. ब्रेडचा उपमा करण्यासाठी सगळ्यात आधी तुकडे तोडून मिक्सरमध्ये घाला त्यानंतर या तुकड्यांचा बारीक चुरा करून घ्या. एका कढईत तेल गरम करून त्यात जीरं, मोहोरी, कढीपत्ता, शेंगदाणे, बारीक चिरलेला टोमॅटो घालून परतून घ्या.
ओटी पोट, मांड्यांचे फॅट कमी होत नाही? रामदेव बाबा सांगतात १ उपाय, भराभर वजन कमी होईल
हे जिन्नस व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर त्यात, मीठ, मसाला, लाल तिखट, हळद घालून एकजीव करून घ्या. यात ब्रेडचा बारीक केलेला चुरा घालून मिश्रण पुन्हा एकजीव करा. त्यानंतर यावर झाकण ठेवून मिश्रण वाफेवर शिजवून घ्या. तयार आहे. गरमागरम ब्रेडचा उपमा.