नाश्ता म्हटलं की पोहे, उपमा, इडली, डोसा, मेदू वडा हे पदार्थ आवडीने खाल्ले जातात. जेवणात बाजरी, ज्वारी, तांदळाच्या भाकऱ्या, किंवा गव्हाच्या चपात्या खाल्ल्या जातात. पण नाश्त्यामध्ये काहीतरी ट्विस्ट म्हणून आपण कधी गव्हाच्या पिठाचा डोसा ट्राय करून पाहिला आहे का?
आजकाल डोसा अनेक प्रकारचे केले जातात. रवा डोसा, मूग डाळीचा डोसा, ब्रेड डोसा. हे डोसे झटपट तयार होतात. जर आपल्याला रोजची चपाती खाऊन कंटाळा आला असेल, किंवा टिफिनसाठी मुलांना झटपट चविष्ट पदार्थ बनवून द्यायचा असेल तर, गव्हाच्या पिठाचा डोसा हा पदार्थ नक्की ट्राय करून पाहा(Instant Breakfast Crispy Wheat Flour Dosa In 10 Minutes).
गहू - रवा डोसा करण्यासाठी लागणारं साहित्य
गव्हाचं पीठ - एक कप
अर्धा कप - रवा
तेल
कोथिंबीर
फक्त एक कप मूग डाळीचा करा खमंग - चविष्ट, स्पंजी ढोकळा, १५ मिनिटात डिश रेडी
आलं
हिरवी मिरची
मीठ
बारीक चिरलेला कांदा
पाणी
कृती
सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये एक कप गव्हाचं पीठ घ्या, त्यात २ चमचे तेल किंवा तूप घाला, आता त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेलं आलं, कोथिंबीर, मीठ, एक कप पाणी घालून बॅटर सरसरीत करा. त्यानंतर त्यात अर्धा कप रवा, व पुन्हा अर्धा कप पाणी घालून मिक्स करा. ज्याप्रमाणे आपण घावणसाठी सरसरीत बॅटर तयार करतो, त्याचप्रमाणे बॅटर तयार करा. व बॅटर तयार करताना त्यात पिठाच्या गुठळ्या तयार होणार नाही याची काळजी घ्या.
पावसाळ्यात कांदे - बटाटे लवकर सडतात, कोंब फुटतात? ३ टिप्स, कांदे बटाटे टिकतील भरपूर
दुसरीकडे नॉन स्टिक पॅन गरम करण्यासाठी ठेवा. पॅन गरम झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घाला. व चमच्याने बॅटर कांद्यावर पसरवा. वरून तेल सोडून, दोन्ही बाजूने डोसा खरपूस भाजून घ्या. अशा प्रकारे गव्हाच्या पिठाचा कुरकुरीत डोसा खाण्यासाठी रेडी. आपण हा डोसा चटणी किंवा बटाट्याच्या भाजीसोबत खाऊ शकता.