Lokmat Sakhi >Food > झटपट नाश्ता, 4 वाजताचा खाऊ- करा मस्त दहीपोहे! 5 मिनिटांत मस्त मेजवानी...

झटपट नाश्ता, 4 वाजताचा खाऊ- करा मस्त दहीपोहे! 5 मिनिटांत मस्त मेजवानी...

सारखे कांदेपोहे, दूध-साखर पोहे खाऊन कंटाळा आला तर नक्की ट्राय करा आगळेवेगळे दहीपोहे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2022 11:57 AM2022-04-27T11:57:33+5:302022-04-27T12:01:49+5:30

सारखे कांदेपोहे, दूध-साखर पोहे खाऊन कंटाळा आला तर नक्की ट्राय करा आगळेवेगळे दहीपोहे...

Instant Breakfast, for eve snack - Have a great Dahipohe! Cool menu in 5 minutes ... | झटपट नाश्ता, 4 वाजताचा खाऊ- करा मस्त दहीपोहे! 5 मिनिटांत मस्त मेजवानी...

झटपट नाश्ता, 4 वाजताचा खाऊ- करा मस्त दहीपोहे! 5 मिनिटांत मस्त मेजवानी...

Highlightsउन्हाळ्यात गारेगार आणि तरीही हेल्दी नाश्त्याला उत्तम पर्यायआंबट गोड चवीचे हे पोहे घरात लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत सगळेच आवडीने खाऊ शकतात.

सारखं नाश्त्याला किंवा संध्याकाळी ६ वाजता खायला काय करायचं असा प्रश्न तमाम महिलांपुढे असतो. पोहे, उपीट, इडली, डोसा यांच्या पलिकडे मुलांना आणि घरातल्या सगळ्यांनाच छान खायला लागतं. घरात चविष्ट खायला नसलं की मग मुले आणि मोठेही बाहेर खातात. पण सतत बाहेर खाल्ल्यामुळे त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे घरातले खाल्लेले केव्हाही चांगले. उन्हाळ्याच्या दिवसांत तर कडक उन्हामुळे दुपारचे जेवणच नको वाटते. अशावेळी सकाळी भरपेट नाश्ता केलेला असेल की पुढची कामे चांगली होतात. 

(Image : Google)
(Image : Google)

इतकेच नाही तर ऊन्हामुळे दिवसभर पाणी पाणी होत असल्याने अनेकदा संध्याकाळी ५ नंतर दणकून भूक लागते. अशावेळी छान गारेगार आणि झटपट होणारा पदार्थ कोणता तर दहीपोहे. कांदे पोहे, कधी बटाटे घालून केलेले पोहे किंवा दूध साखर पोहे नाहीतर दडपे पोहे हे प्रकार आपल्याला माहित असतात. पण हे करायला थोडा वेळ लागतो, मात्र दही घालून केलेले हे पोहे होतातही पटकन. मुख्य म्हणजे दही आणि दाणे यांच्यामुळे शरीलाला प्रोटीन्स मिळत असल्याने हे पोहे हेल्दी असतात. हिंग, जीरे आणि खाराची मिरची यामुळे याला छान स्वाद येतो. आंबट गोड चवीचे हे पोहे घरात लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत सगळेच आवडीने खाऊ शकतात. पाहूयात हे दहीपोहे कसे करायचे

साहित्य - 

१. जाड पोहे - २ वाट्या 
२. दही - १ ते १.५ वाटी 
३. तेल - २ चमचे
४. मीठ - चवीनुसार
५. साखर - चवीनुसार 
६. दाणे - एक मूठ
७. खाराची मिरची किंवा लाल मिरची - ३ 
८. हिंग - पाव चमचा
९. जीरे - पाव चमचा
१०. कडिपत्ता - ७ ते ८ पाने
११. कोथिंबीर - अर्धी वाटी बारीक चिरलेली 

(Image : Google)
(Image : Google)

कृती- 

१. आपण पोहे करण्यासाठी ज्याप्रमाणे पोहे भिजवतो तसेच भिजवायचे
२. दह्याचे घट्टसर ताक करुन घ्यायचे.
३. हे ताक, साखर आणि मीठ पोह्यात घालायचेय
४. कढईत तेल घालून त्यामध्ये जीरे, हिंग, कडिपत्ता, दाणे आणि खाराची मिरची घालायची.
५. ही फोडणी पोह्यांवर घालून सगळे नीट एकत्र करायचे. 
६. वरुन बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घालायची.
७. अगदी ५ मिनीटांत होणारे गारेगार दहीपोहे उन्हाळ्याच्या दिवसांत पर्वणीच.

Web Title: Instant Breakfast, for eve snack - Have a great Dahipohe! Cool menu in 5 minutes ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.