Lokmat Sakhi >Food > २ बटाटे-कपभर रवा, चमचाभर तेलामध्ये करा बटाट्याचे अप्पे; १० मिनिटात क्रिस्पी नाश्ता रेडी

२ बटाटे-कपभर रवा, चमचाभर तेलामध्ये करा बटाट्याचे अप्पे; १० मिनिटात क्रिस्पी नाश्ता रेडी

Instant breakfast recipe | potato snacks | Appe recipe : विकेंडला नाश्त्यासाठी करा टम्म फुगलेले, कुरकुरीत बटाट्याचे अप्पे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2024 01:37 PM2024-04-26T13:37:09+5:302024-04-26T13:37:39+5:30

Instant breakfast recipe | potato snacks | Appe recipe : विकेंडला नाश्त्यासाठी करा टम्म फुगलेले, कुरकुरीत बटाट्याचे अप्पे..

Instant breakfast recipe | potato snacks | Appe recipe | २ बटाटे-कपभर रवा, चमचाभर तेलामध्ये करा बटाट्याचे अप्पे; १० मिनिटात क्रिस्पी नाश्ता रेडी

२ बटाटे-कपभर रवा, चमचाभर तेलामध्ये करा बटाट्याचे अप्पे; १० मिनिटात क्रिस्पी नाश्ता रेडी

बहुतांश पदार्थात वापरण्यात येणारी भाजी म्हणजे बटाटा (Appe Recipe). भाजी, पराठा, खिचडी यासह अनेक पदार्थांमध्ये बटाट्याचा वापर होतो. बटाटा घालताच पदार्थ रुचकर लागतो. बरेच जण नाश्त्याच्या पदार्थातही बटाटे घालतात. पोहे, उपमा, डोसे, इडली यासह इतर पदार्थांमध्ये आपण बटाटे घालतोच (Cooking Tips). पण कधी बटाट्याचे अप्पे खाऊन पाहिलं आहे का?

डाळ - तांदूळ किंवा रव्याचे अप्पे आपण खाल्लेच असतील. काहीवेळेला अप्पे करताना प्रमाण चुकते. किंवा व्यवस्थित अप्पे फुलत नाही. जर आपली देखील हीच तक्रार असेल तर, एकदा या पद्धतीने अप्पे तयार करून पाहा. डाळ-तांदूळ भिजत घालायला आपण विसरले असाल तर, नाश्त्याला बटाट्याचे अप्पे करा. चमचमीत रेसिपी काही मिनिटात तयार होईल(Instant breakfast recipe | potato snacks | Appe recipe).

बटाट्याचे अप्पे करण्यासाठी लागणारं साहित्य

बटाटे

रवा

पाणी

ऐन तारुण्यात हाडं ठणकतात? नजरही धूसर झाली? रोज खा '१' पौष्टीक लाडू; आरोग्य सुधारेल

हिरवी मिरची

कांदा

कोथिंबीर

मीठ

बेकिंग सोडा

तेल

कृती

सर्वप्रथम, बटाट्याची साल काढून चिरून घ्या. चिरलेले बटाटे मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या. त्यात २ बारीक चिरलेली हिरवी मिरची, एक इंच आलं आणि २ टेबलस्पून पाणी घालून पेस्ट तयार करा.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणींना 'फुलगोभी मंचुरियन' आवडते? ढाब्यावाल्याने लढवली शक्कल; इराणी म्हणतात...

तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात एक कप रवा घालून मिक्स करा. त्यावर १० मिनिटांसाठी झाकण ठेवा. १० मिनिटानंतर त्यात एक बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.

नंतर त्यात अर्धा छोटा चमचा बेकिंग सोडा, ४ टेबलस्पून पाणी घालून मिक्स करा. आता अप्पे पात्र गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. त्याला ब्रशने तेल लावा. त्यात एक चमचा बॅटर सोडा आणि झाकण ठेवा. मध्यम आचेवर अप्पे शिजवून घ्या. अशाप्रकारे बटाट्याचे अप्पे खाण्यासाठी रेडी. आपण हे अप्पे चटणी आणि सांबार खाऊ शकता. 

Web Title: Instant breakfast recipe | potato snacks | Appe recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.