Lokmat Sakhi >Food > फक्त १ वाटी रवा वापरुन करा नाश्त्याला गरगागरम पौष्टिक डोसे, करा दिवसाची चविष्ट सुरुवात

फक्त १ वाटी रवा वापरुन करा नाश्त्याला गरगागरम पौष्टिक डोसे, करा दिवसाची चविष्ट सुरुवात

Instant Breakfast Recipes : फक्त १ वाटी रव्यापासून तयार होणारा एक सोपा झटपट नाश्ता पाहणार आहोत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 06:54 PM2022-11-25T18:54:24+5:302022-11-26T13:50:55+5:30

Instant Breakfast Recipes : फक्त १ वाटी रव्यापासून तयार होणारा एक सोपा झटपट नाश्ता पाहणार आहोत.

Instant Breakfast Recipes : soft, spongy rava dosa recipe | फक्त १ वाटी रवा वापरुन करा नाश्त्याला गरगागरम पौष्टिक डोसे, करा दिवसाची चविष्ट सुरुवात

फक्त १ वाटी रवा वापरुन करा नाश्त्याला गरगागरम पौष्टिक डोसे, करा दिवसाची चविष्ट सुरुवात

नाश्ता कधीही स्किप करू नये असं डॉक्टर नेहमीच सांगतात. कारण रात्री ८ ते ९ तास  उपाशी असल्यानं सकाळी उठल्यानंतर पोटाला अन्नाची गरज असते.  (Cooking Tips) जर तुम्ही फक्त चहा किंवा कॉफी घेतली आणि नाश्ता केला नाही तर दिवसभर थकल्यासारखं वाटू शकतं. उत्साही वाटत नाही.  (Breakfast Idea's)अनेकांना नाश्ता बनवण्यासाठी जास्त वेळ मिळत  नाही म्हणून ते चहा बिस्किट्स किंवा फळ खाऊन दिवसाची सुरूवात करतात. या लेखात फक्त १ वाटी रव्यापासून तयार होणारा एक सोपा झटपट नाश्ता पाहणार आहोत.  हा पदार्थ तयार करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. (Soft, spongy rava dosa recipe)

साहित्य

१ वाटी हलका भाजलेला रवा

1/4 था कप गव्हाचे पीठ

१/२ कप दही

एक छोटा कांदा

एक हिरवी मिरची

½ इंच आले

चवीनुसार मीठ

आवश्यकतेनुसार पाणी

1/8वा टीस्पून बेकिंग सोडा

कोथिंबीरीची पाने

तळण्यासाठी तूप

कृती

1) सगळ्यात आधी रवा, दही, कांदा, आलं, कोथिंबीर, मीठ, पाणी एकत्र करून घ्या.

2) नंतर त्यात पाणी कोथिंबीर, बेकींग सोडा घालून मिश्रण बनवून घ्या.

3) तव्यावर तेल गरम झालं की, मिश्रण घालून मध्यम आकाराचे डोसे करून घ्या.

 

 

Web Title: Instant Breakfast Recipes : soft, spongy rava dosa recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.