नाश्ता कधीही स्किप करू नये असं डॉक्टर नेहमीच सांगतात. कारण रात्री ८ ते ९ तास उपाशी असल्यानं सकाळी उठल्यानंतर पोटाला अन्नाची गरज असते. (Cooking Tips) जर तुम्ही फक्त चहा किंवा कॉफी घेतली आणि नाश्ता केला नाही तर दिवसभर थकल्यासारखं वाटू शकतं. उत्साही वाटत नाही. (Breakfast Idea's)अनेकांना नाश्ता बनवण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही म्हणून ते चहा बिस्किट्स किंवा फळ खाऊन दिवसाची सुरूवात करतात. या लेखात फक्त १ वाटी रव्यापासून तयार होणारा एक सोपा झटपट नाश्ता पाहणार आहोत. हा पदार्थ तयार करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. (Soft, spongy rava dosa recipe)
साहित्य
१ वाटी हलका भाजलेला रवा
1/4 था कप गव्हाचे पीठ
१/२ कप दही
एक छोटा कांदा
एक हिरवी मिरची
½ इंच आले
चवीनुसार मीठ
आवश्यकतेनुसार पाणी
1/8वा टीस्पून बेकिंग सोडा
कोथिंबीरीची पाने
तळण्यासाठी तूप
कृती
1) सगळ्यात आधी रवा, दही, कांदा, आलं, कोथिंबीर, मीठ, पाणी एकत्र करून घ्या.
2) नंतर त्यात पाणी कोथिंबीर, बेकींग सोडा घालून मिश्रण बनवून घ्या.
3) तव्यावर तेल गरम झालं की, मिश्रण घालून मध्यम आकाराचे डोसे करून घ्या.