Join us  

ना भाजणी ना झंझट, ताकातली कुरकुरीत चकली एकदा करून पाहाच; आंबट - तिखट चवीच्या चकल्या रेडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2024 11:40 AM

Instant Buttermilk Chakli in just 10 mins/ Instant Buttermilk chakli for Diwali : चकल्या बिघडतात? तेल फार पितात? ताकातली चकली 'या' पद्धतीने करून पाहा

दिवाळी (Diwali) म्हटलं की सर्वात आधी डोळ्यासमोर येतो तो फराळ (Diwali Faral). चकली, करंजी, चिवडा, शंकरपाळी, लाडू यासह विविध पदार्थ केले जातात. चकलीशिवाय फराळ अपुरे आहे (Diwali 2024). कुरकुरीत चकली खायला प्रत्येकाला आवडते. लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण आधी चकली फस्त करतात (Cooking Tips). पण खुसखुशीत, काटेरी चकली करणं सोपं काम नाही. कधी तेलात तळताना चकली विरघळते, किंवा चकली खूप कडक होते.

चकली करताना आपण आधी भाजणी तयार करतो. पण जर आपल्याला भाजणीचा वापर न करता, कुरकुरीत खमंग चकली करायची असेल तर, ताकातली क्रिस्पी चकली करून पाहा. पचनक्रिया सुधारण्यासाठी आपण ताक पितो. याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. जर आपल्याला झटपट चकली करायच्या असतील तर, ही रेसिपी नक्कीच फॉलो करून पाहा(Instant Buttermilk Chakli in just 10 mins/ Instant Buttermilk chakli for Diwali).

ताकातली कुरकुरीत चकली करण्यासाठी लागणारं साहित्य

ताक

तांदुळाचं पीठ

पेल्यातलं वादळ विसरा-करा पेल्यातला ढोकळा! ‘ग्लास खमण ढोकळा’ करा-पाहा सोपा -भन्नाट पदार्थ

बेसन

भाजलेली चणा डाळ

तेल

लसूण

मीठ

लाल तिखट

जिरे

ओवा

धणे पूड

कृती

सर्वात आधी एका कढईमध्ये दीड वाटी पाणी घाला. पाणी गरम झाल्यानंतर त्यात एक वाटी ताक, ५ - ६ ठेचलेला लसूण घाला. २ मिनिटानंतर त्यात चवीनुसार मीठ, लाल तिखट, धणे पुड, अर्धा चमचा ओवा, जिरे आणि पांढरे तीळ घालून मिक्स करा.

नंतर त्यात दीड वाटी तांदुळाचं पीठ, बेसन आणि २ चमचे तेल घाला. आणि लाकडी चमच्याने मिक्स करा. गॅसची फ्लेम कमी ठेवा. जर पीठ सैल झालं असेल तर, आपण त्यात तांदुळाचं पीठ घालू शकता. आता त्यावर झाकण ठेवा. वाफेवर पीठ शिजवून घ्या. आता तयार पीठ एका परातीमध्ये काढून घ्या.

२ मिनिटांत करा झटपट इन्स्टंट पोहे? १ ट्रिक; नूडल्सपेक्षा झटपट करा पौष्टिक पोहे

थोडं थंड झाल्यानंतर, पाण्याचा हात लावून पीठ मळून घ्या. चकलीचा साचा घ्या. त्याच्या आतील बाजूस ब्रशने तेल लावा. त्यात तयार पीठ घालून चकली पाडून घ्या. दुसरीकडे कढई गरम करण्यासाठी ठेवा. त्यात चकली सोडून दोन्ही बाजूने कुरकुरीत तळून घ्या. अशा प्रकारे ताकातली कुरकुरीत चकली खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :दिवाळी 2023कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न