Join us  

गाजराची कोशींबीर खाल्ली असेल, गाजराची आंबट-गोड-तिखट चटणी खाल्ली का? उन्हाळा होईल चविष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2023 10:12 AM

Instant Carrot Chutney | Andhra Style Carrot Chutney गाजर आवडत नाही, नेहमीचे सॅलेड खाऊन कंटाळा आला असेल तर करा ही खास चटणी

जेवणाची रंगत खरंतर चटणी, लोणचे, पापडामुळे वाढते. जेवताना तोंडी लावण्यासाठी ताटात चटणी हवीच. आपल्या भारतात विविध प्रकारच्या चटण्या मिळतात. विविध भागात त्यांच्या शैलीनुसार चटणी करण्यात येते. महाराष्ट्रात गाजराची चटणी देखील आवडीने खाल्ली जाते. गाजराचा वापर आपण हलवा व भाज्यांमध्ये केला असेल, पण गाजराची चटणी देखील चवीला उत्कृष्ट लागते.

गाजरामध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी, डी, ई, जी आढळते. गाजरामध्ये बीटा कॅरेटीनचं प्रमाण अधिक असतं. डोळ्यांसह रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी गाजर खायला हवेच. काहींना गाजर खायला आवडते तर काहींना नाही. आपण त्यांना गाजराची चटणी बनवून देऊ शकता. कमी साहित्यात कमी वेळात ही रेसिपी तयार होते(Instant Carrot Chutney | Andhra Style Carrot Chutney).

गाजराची चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य

गाजर - 3 ते 4

मोहरी

लाल मिरची - 8

अस्सल पंजाबी लस्सी घरच्याघरी करण्याची सोपी रेसिपी, पंजाबी मिठी लस्सी पिऊन तर पाहा

तेल

कढीपत्ता

मीठ - चवीनुसार

गुळ

या पद्धतीने बनवा आंबट गोड चवीची गाजराची चटणी

सर्वप्रथम, एका वाटीत पाणी घ्या, त्यात मोहरी आणि लाल सुक्या मिरच्या दोन तासांसाठी भिजत ठेवा. त्यानंत्तर गाजराचे छोटे छोटे काप करून घ्या. आता मिक्सरच्या भांड्यात गाजराचे काप, मोहरी व लाल सुक्या मिरच्या घालून पेस्ट तयार करा.

उन्हाळ्यात करा कच्च्या करवंदाची चटकदार चटणी, कमी साहित्यात, बनते झटपट

तडका देण्यासाठी कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा, त्यात मोहरी, कडीपत्ता, व गाजराची पेस्ट घालून मिक्स करा. मिश्रण लो फ्लेममध्ये मिक्स करा. आता त्यात अर्धा कप पाणी, एक चमचा गुळ, चवीनुसार मीठ घालून मिश्रण चांगले मिक्स करा.

साऊथ इंडियन कारा चटणीची झटपट कृती, इडली-डोशासोबत खाण्यासाठी चटकदार चटणी

त्यावर ५ मिनिटांसाठी झाकण ठेऊन एक वाफ द्या. ५ मिनिटानंतर गॅस बंद करा. थंड झाल्यानंतर चटणी एका हवाबंद डब्यात भरून ठेवा. अशा प्रकारे गाजराची आंबड - गोड - तिखट चवीची चटणी खाण्यासाठी रेडी. आपण ही चटणी इडली - डोसा किंवा भातसह देखील खाऊ शकता.

टॅग्स :अन्नकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.