Join us  

२ गाजराचे करा चमचमीत लोणचे, चव चटकदार-कराल जेवण पोटभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2024 1:31 PM

instant carrot pickle recipe - gajar ka achar : गाजराचा हलवा नेहमीचाच, यंदा चटकमटक आणि लज्जतदार लोणचं तयार करून पाहा..

जेवणाची रंगत वाढवण्यासाठी आपण ताटात लोणचे, मसाले, चटणी किंवा पापड घेतोच. ताटात लोणचं असेल तर, आपण २ घास एक्स्ट्रा खातो. चटकदार लोणचे अनेकांना आवडते (Gajarache Lonche). शिवाय लोणचे अनेक प्रकारचे केले जाते. हिवाळ्यात आवळा, आंबा, मिक्स लोणचं आवडीने खाल्ले जाते. पण आपण कधी घरात गाजराचे लोणचे करून पाहिलं आहे का? गाजराचा रायता, गाजराची कोशिबीर, गाजराचा हलवा आपण करतोच (Cooking Tips).

पण यंदा गाजराचा लोणचं तयार करून पाहा. गाजरामध्ये फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, बी, कॅल्शियम असते. जे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते (Carrot Pickle). जर आपल्याला गाजराचे गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर, एकदा गाजराचे चटकदार लोणचे करून खा. वाढेल जेवणाची रंगत(instant carrot pickle recipe - gajar ka achar).

गाजराचं लोणचं करण्यासाठी लागणारं साहित्य

गाजर

मीठ

बडीशेप

दुधावर येईल घट्ट साय, दूध तापवताना लक्षात ठेवा ५ टिप्स; मिळेल भरपूर साय

जिरं

मेथी दाणे

आलं

मोहरीचे दाने

हिंग

लाल तिखट

हळद

लिंबाचा रस

कृती

सर्वप्रथम, गाजराचा वरचा भाग किसून घ्या, व गाजर चिरून घ्या. चिरलेले गाजर एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यावर चवीनुसार मीठ शिंपडून मिक्स करा. दुसरीकडे मिक्सरच्या भांड्यात एक चमचा बडीशेप, जिरं, आणि मेथी दाणे घालून पावडर तयार करा.

चपाती लाटताना फाटते? शेफ पंकज भदौरिया सांगतात ३ ट्रिक्स; पोळ्या होतील परफेक्ट

एका कढईत २ चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेलं आलं, मोहरीचे दाणे, अर्धा चमचा हिंग, बारीक चिरलेला गाजर घालून मिक्स करा. २ मिनिटानंतर त्यात एक चमचा लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ, वाटलेली पावडर आणि लिंबाचा रस घालून मिक्स करा. २ मिनिटापर्यंत मध्यम आचेवर गाजर शिजवून घ्या.

२ मिनिटानंतर गॅस बंद करा. तयार लोणचं एका हवाबंद डब्यात साठवून ठेवा. अशाप्रकारे गाजराचं चटकदार लोणचं खाण्यासाठी रेडी. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स