Join us  

ना गॅस - ना पाकाची झंझट, किसलेल्या खोबऱ्याचे करा झटपट लाडू, दिवाळीनिमित्त खा खास - हेल्दी लाडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2024 7:03 PM

Instant Coconut Ladoo Recipe - No Gas, 2 Ingredients : दिवाळीला करा इन्स्टंट खोबऱ्याचे पौष्टीक लाडू, अगदी १५ मिनिटात लाडू रेडी

ठिकठिकाणी थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली (Diwali 2024). दिवाळीचा सणही काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळी म्हणजे रोषणाईचा सण (Festival of Lights). दिवाळीला हमखास लाडू केले जातात (Diwali Laddoo). लाडूचे अनेक प्रकार आहेत. कुणी शेव, बुंदी तर कुणी बेसनाचे लाडू करतात (Cooking Tips). जर लाडू करण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ नसेल आणि लाडू झटपट बनवायचे असतील तर, खोबऱ्याचेही लाडू करून पाहू शकता.

सुकं खोबरं खाण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. तसेच इतर अनेक आजारही दूर होतात. सुक्या खोबऱ्यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, लोह, कॅल्शियम, मॅंगनीज, सेलेनियम, तांबे, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम हे पोषक घटक असतात. ज्याचा फायदा आरोग्याला होतोच. आपण खोबऱ्याचे पौष्टीक लाडू नक्कीच ट्राय करून पाहू शकता(Instant Coconut Ladoo Recipe - No Gas, 2 Ingredients).

सुकं खोबऱ्याचे पौष्टीक लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य

मिल्क पावडर

सुकं खोबऱ्याची पावडर

काजूची पावडर

टॉयलेट-बाथरुमच्या अस्वच्छ टाइल्स चमकतील चकाचक, कोल्ड ड्रिंकचा ‘असा’ करा वापर; पिवळे डाग गायब

अर्धा कप पिठीसाखर

दूध

वेलची पूड

कृती

सर्वात आधी एका परातीत एक कप मिल्क पावडर घ्या. त्यात दोन कप सुकं खोबऱ्याची पावडर, काजूची पावडर, अर्धा कप पिठीसाखर, अर्धी वाटू दूध आणि वेलची पूड घालून मिक्स करा.

दिवाळीत फोटो सुंदर यायला हवेत? आजपासून फॉलो करा ७ गोष्टी- १० दिवसांत घटेल वजन

दूध गरजेनुसार घालत राहा. आणि आपण कणिक ज्या पद्धतीने मळतो, त्याच पद्धतीने मळून घ्या. आता हाताला तूप लावा. छोटा गोळा घ्या, आणि लाडू वळवून घ्या. अशा प्रकारे खोबऱ्याचे पौष्टीक लाडू खाण्य्साठी रेडी.   

टॅग्स :दिवाळी 2024कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अन्न