Join us  

कुकरमध्ये बासूंदी? करा झटपट ‘कुकर बासूंदी’, ना खाली लागण्याची भीती-न उतू जाण्याची..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2023 5:39 PM

Instant Cooker Basundi / Thickened Sweet Milk Dessert मस्त घट्ट बासूंदी हवी तर ती करायला वेळ लागतोच, पण कुकर बासूंदी करुन पाहा.. सोपी आणि स्वादिष्ट

बासुंदी हा गोड पदार्थ सणासुदीच्या काळात बनवला जातो. या पदार्थाची चव वाढवण्यासाठी आपण यात सुकामेव्यासह अनेक गोष्टींचा वापर करतो. या पदार्थांमुळे बासुंदीची चव दुपट्टीने वाढते. दुधापासून तयार होणारा हा पदार्थ महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकातील काही भागांत अतिशय लोकप्रिय आहे. पण बासुंदी बनवण्यासाठी खूप वेळ जातो. आपण हा पदार्थ प्रेशर कुकरमध्ये काही मिनिटात करू शकता.

प्रेशर कुकरमध्ये बनवण्याचं वैशिष्ट्य म्हणजे यात बासुंदी हॉटेल स्टाईल घट्ट व गोडसर बनते. कमी साहित्यात - काही मिनिटात तयार होते. आपल्या घरी जर पाहुणे मंडळी न सांगता आले असतील, तर त्यांच्यासाठी आपण हा पदार्थ झटपट कमी साहित्यात बनवू शकता. चला तर मग या गोड पदार्थाची कृती पाहूयात(Instant Cooker Basundi / Thickened Sweet Milk Dessert).

कणिक मळून ठेवली की काळी पडते? ४ टिप्स, सकाळी मळून ठेवली तरी कणिक दिसेल ताजी

बासुंदी बनवण्यासाठी लागणारं साहित्य

१ लिटर दूध

अर्धी वाटी साखर

काजू

बदाम

चारोळी

अरे बापरे भात करपला? भाताचा जळका वास झटपट घालवण्यासाठी ५ टिप्स, जळका वास गायब

केसर

इलायची पावडर

बासुंदी बनवण्याची कृती

सर्वप्रथम, स्टीलचा प्रेशर कुकर घ्या, त्या कुकरमध्ये १ चमचाभर पाणी घाला, कुकरमध्ये पाणी घातल्यामुळे बासुंदी तळाशी चिकटणार नाही. आता या कुकरमध्ये १ लिटर दूध मध्यम आचेवर तापवून घ्या. दुधाला उकळी आल्यानंतर चमच्याने त्याला ढवळत राहा. दूध अर्धे होईपर्यंत आटवून घ्या.

आता मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी साखर, काजू, बदाम, घालून पावडर तयार करा. आता ही तयार पावडर उकळत्या दुधात घालून चमच्याने मिक्स करा. या पावडरमुळे बासुंदीला घट्टपणा येतो. आता एका वाटीत थंड दूध घ्या, त्या दुधात ८ ते १० पाकळ्या केसर मिक्स करा. आता हे मिश्रण उकळत्या दुधात टाकून मिक्स करा. आता लो फ्लेममध्ये १० मिनिटं बासुंदी उकळवत ठेवा.

मोकळा-चविष्ट परफेक्ट पुलाव करण्यासाठी योग्य तांदूळ कसा निवडायचा? कोणता तांदूळ पुलावासाठी चांगला

१० मिनिटानंतर त्यात क्रश केलेले काजू, बदाम, व चारोळ्या मिक्स करा. शेवटी इलायची पावडर घालून दूध चमच्याने ढवळा, यामुळे पावडर व सुकामेव्याची चव दुधात उतरेल. अशा प्रकारे घट्टसर बासुंदी खाण्यासाठी रेडी.  

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स