Join us  

डाळ भिजतही न घालता फक्त १५ मिनिटांत करा क्रिस्पी मेदूवडे, ब्रेडचे मेदूवडे करण्याची पाहा युक्ती..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2024 10:00 AM

instant & cripsy bread medu vada with leftover bread : मेदूवडे आवडतात, पण डाळ भिजत घालायला वेळ नसेल तर, ब्रेडचे क्रिस्पी मेदूवडे करून पाहा..

साऊथ इंडियन डिशेस खायला अनेकांना आवडते. नाश्त्याला आपण इडली, मेदू वडे, आप्पे, डोसे आपण खातोच (Bread Medu Vada). पण हे पदार्थ करण्याची प्रोसेस खूप मोठी आहे (Cooking Tips). डाळ - तांदूळ भिजत घालण्यापासून ते त्याचे पदार्थ करण्यापर्यंत बराच वेळ जातो (Food). या वेळ खाऊ कामामुळे आपण साऊथ इंडिअन पदार्थ घरात करणं टाळतो.

अनेकदा नाश्त्याला मेदू वडे खाण्याची इच्छा होते. पण मेदू वडे हॉटेलस्टाईल तयार होत नाहीत. जर आपल्याला डाळ भिजत न घालता, मेदू वडे करायचे असतील तर, ब्रेडचे कुरकुरीत मेदू वडे करून पाहा. अगदी काही मिनिटात इन्स्टंट मेदू वडे तयार होतील. शिवाय घरगुती साहित्यात हे मेदू वडे बनतील, आणि फस्तही होतील. ब्रेडचे कुरकुरीत मेदू वडे कसे करायचे? पाहूयात(instant & cripsy bread medu vada with leftover bread).

ब्रेडचे क्रिस्पी मेदू वडे करण्यासाठी लागणारं साहित्य

ब्रेड

रवा

दही

तांदुळाचं पीठ

रोज चपातीसोबत खायला करा लसूण - शेंगदाण्याची झणझणीत चटणी; तोंडाला येईल चव

बेसन

हिरवी मिरची

कोथिंबीर

कडीपत्ता

तेल

जिरं

ओवा

कृती

सर्वात आधी, एका बाऊलमध्ये ब्रेडचे तुकडे करा. त्यात एक कप रवा, एक चमचा बेसन, एक चमचा तांदुळाचं पीठ, एक बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची आणि कडीपत्ता घालून मिक्स करा. नंतर त्यात एक चमचा जिरं, चिली फ्लेक्स, ओवा, चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य एकजीव करा. साहित्य एकजीव करताना आपण त्यात थोडे पाणीही शिंपडू शकता.

हाडं कमजोर - अंगात रक्त कमी? रोज खा ‘हा’ १ पौष्टीक लाडू; कॅल्शियमही भरपूर

दुसरीकडे कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर हातावर थोडे मिश्रण घ्या, त्याला मेदू वड्याचा आकार द्या, व गरम तेलात सोडून सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. अशा प्रकारे ब्रेडचे कुरकुरीत मेदू वडे खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स