आपल्यापैकी बहुतेक सगळ्यांचाच घरी सकाळच्या नाश्त्याला साऊथ इंडियन पदार्थ (South Indian Dosa) अगदी आवडीने खाल्ले जातात. या पदार्थांमध्ये इडली, डोसा, मेंदू वडा अशा अनेक पदार्थांचा समावेश होतो. यातही डोसा हा सगळ्यांच्याच आवडीचा खास पदार्थ. क्रिस्पी, कुरकुरीत डोसा, कुरुंकुरुम (How To Make Butter Dosa) डोसा खाण्याची मजा काही औरच असते. डोशाचे अनेक प्रकार असतात, त्याचबरोबर डोसा असंख्य वेगवेगळ्या पद्धतीने देखील तयार करता येतो(benne dosa recipe).
वेगवेगळी पीठ घेऊन ती पाण्यांत भिजवून किंवा डाळ तांदूळ वाटून, पीठ आंबवून अशा अनेक पद्धती वापरुन डोसा तयार करता येतो. अशा डोशांच्या असंख्य प्रकारांपैकी साऊथ इंडियन कुरकुरीत बेनी डोसा फारच लोकप्रिय आहे. हा डोसा तयार करण्यासाठी आपल्याला डाळ तांदूळ भिजवण्याची, पीठ आंबवण्याची अशी फार मोठी प्रोसेस करावी लागत नाही. आपण झटपट घाईगडबडीच्या वेळी अगदी कमी साहित्यात तयार होणारा पारंपरिक बेनी डोसा करु शकतो. पारंपरिक बेनी डोसा घरच्याघरी तयार करण्याची सोपी रेसिपी पाहूयात(Instant crispy Benne Dosa recipe for breakfast).
साहित्य :-
१. रवा - १ कप
२. जाडे पोहे - १/२ कप
३. पाणी - गरजेनुसार
४. ताक - १ कप
५. तांदुळाचे पीठ - ३/४ कप
६. गव्हाचे पीठ - २ ते ३ टेबलस्पून
७. साखर - १ टेबलस्पून
८. मीठ - चवीनुसार
९. इनो / फ्रुट सॉल्ट - १ टेबलस्पून
१०. बटर - गरजेनुसार
इडली- डोशाचे पीठ खूप आंबले तर वाया जाते, लक्षात ठेवा ५ गोष्टी! पीठ फसफसणार नाही...
कारल्याची कुरकुरीत भजी खाऊन तर पाहा, भर पावसात कारल्याची भजीही लागतील खमंग...
कृती :-
१. एका बाऊलमध्ये रवा घेऊन त्यात थोडे पाणी घालून रवा मिक्स करुन १० ते १५ मिनिटे भिजत ठेवावा.
२. दुसऱ्या एका बाऊलमध्ये जाडे पोहे घेऊन त्यात ताक ओतून पोहे सुद्धा १० ते १५ मिनिटे भिजत ठेवावेत.
३. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात ही दोन्ही भिजवून घेतलेली मिश्रण आणि गरजेनुसार त्यात पाणी घालून मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटून घ्यावे.
मदुराई स्पेशल ‘थन्नी चटणी’ खाऊन तर पाहा, इडली-डोसा लागेल मस्त-चमचमीत चटणीची रेसिपी...
४. मिक्सरमध्ये वाटून घेतलेले बॅटर एका बाऊलमध्ये काढून त्यात गव्हाचे पीठ, तांदुळाचे पीठ, व चवीनुसार साखर, मीठ घालावे.
५. आता या मिश्रणात गरजेनुसार पाणी घालून डोशाला आपण ज्या कन्सिस्टंन्सीचे बॅटर करतो तसेच बॅटर तयार करुन घ्यावे.
६. सगळ्यांत शेवटी या बटरमध्ये इनो किंवा फ्रुटस सॉल्ट घालून त्यावर चमचाभर पाणी घालून ते बटरमध्ये व्यवस्थित मिक्स करुन घ्यावे.
७. आता एक पॅन व्यवस्थित गरम करुन त्याला तेल लावून त्यावर हे बॅटर ओतून डोसे दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्यावेत. डोसा भाजताना आपण आपल्या आवडीनुसार त्यावर बटर किंवा लोणी घालून डोसा भाजू शकता.
आपला गरमागरम बेनी डोसा खाण्यासाठी तयार आहे चटणी व सांबारासोबत हा बेनी डोसा खाण्यासाठी सर्व्ह करावा.