Join us  

ना भाजणीची धावपळ, ना तेलात चकली विरघळण्याचं टेंशन, १० मिनिटांत करा इन्स्टंट बटर चकली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2024 7:39 PM

Instant Crispy Butter Chakli Recipe : How To Make Instant Crispy Butter Chakli At Home : यंदाच्या दिवाळीला दरवर्षीची तीच ती भाजणीची चकली करण्यापेक्षा आपण बटर चकली घरच्या घरीच तयार करु शकतो...

दिवाळीच्या (Diwali 2024) फराळामधील सगळ्यांच्याच आवडीचा एक पदार्थ म्हणजे चकली. चकली शिवाय फराळाचे ताट हे अपूर्णच आहे. फराळाच्या ताटातील लाडू, शंकरपाळे, मिठाया, करंजी असे गोड पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल, किंवा काहीतरी तिखट, मसालेदार खावेसे वाटत असेल तर चकली हा एकमेव पर्याय आहे. फराळाच्या पदार्थांमध्ये सर्वात आधी चकलीचाच डबा रिकामी होतो. त्यामुळे कितीही किलोची चकली केली तर, ती लवकर संपतेच(Butter Chakli).

फराळाची चकली म्हटलं की, आपल्याला सर्वात आधी आठवते ती भाजणीची खरपूस, कुरकुरीत चकली. भाजणीची चकली बनवण्यासाठी आपल्याला आधी चकलीची भाजणी तयार करुन घ्यावी लागते. ही भाजणी जर परफेक्ट झाली तर ठिक, भाजणी बनवताना जरा गडबड, गोंधळ झाला की चकली फसलीच म्हणून समजा. भाजणीची चकली बनवण्यासाठी भाजणी उत्तम तयार होणे गरजेचे असते. परंतु असे असले तरीही आजकाल बाजारांत वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या चकल्या अगदी सहज विकत मिळतात. तांदुळाची चकली, बटर चकली, शेजवान चकली अशा असंख्य फ्लेवर्समध्ये चकल्या उपलब्ध असतात. यंदाच्या दिवाळीला दरवर्षीची तीच ती भाजणीची चकली करण्यापेक्षा आपण बटर चकली (How To Make Instant Crispy Butter Chakli At Home) घरच्या घरीच तयार करु शकतो. कुरकुरीत, मसालेदार, काटेरी चकली खायला सगळ्यांनाच आवडते. फराळाच्या ताटातील चकली हा सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आहेच, पण यावर्षी काहीतरी वेगळं नक्की ट्राय करुन पाहा. tarladalal यांच्या इन्स्टाग्राम पेजवरुन या साध्या सोप्या बटरचकलीची रेसिपी शेअर करण्यात आली आहे(Instant Crispy Butter Chakli Recipe).

साहित्य :- 

१. तांदुळाचे पीठ - १ कप २. बटर - १ टेबलस्पून ३. जिरे - १/२ टेबलस्पून ४. काळे तीळ - १ टेबलस्पून ५. मीठ - चवीनुसार ६. तेल - तळण्यासाठी ७. पाणी - १ कप 

चिवडा होईल वातड की लाडूचा होईल दगड, विसरा टेंशन! परफेक्ट फराळासाठी १० टिप्स...

कोण म्हणते अनारसा करणे कठीण काम? ही घ्या झटपट अनारसे करण्याची कृती, खा जाळीदार अनारसे...

कृती :- 

१. एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन ते पाणी गरम करून घ्यावे. पाणी गरम झाल्यावर गॅस मंद आचेवर करून त्यात बटर, जिरे, काळे तीळ, चवीनुसार मीठ घालावे. २. आता यात तांदुळाचे पीठ घालून पाणी आटेपर्यंत ४ ते ५ मिनिटे शिजवून घ्यावे. त्यानंतर गॅस बंद करून हे पीठ एका डिशमध्ये काढून घ्यावे. 

केशर पदार्थात घालताना तुम्हीही हमखास करताय ‘ही’ चूक, महागडं केशर वापरुनही रंग-स्वाद गायब कारण...

३. हाताला थोडेसे तेल लावून हे पीठ व्यवस्थित मळून घ्यावे. पीठ मळून झाल्यानंतर त्याचा गोळा तयार करून घ्यावा. ४. आता या पिठाचा गोळा चकलीच्या साच्यात घालून चकल्या पाडून घ्याव्यात. ५. एका कढईत चकल्या तळण्यासाठी तेल तापवून घ्यावे. त्यानंतर गरम तेलात चकल्या तळून घ्याव्यात. 

जास्त मेहेनत न करता झटपट तयार होणारी इंस्टंट बटर चकली खाण्यासाठी तयार आहे.

टॅग्स :दिवाळी 2024अन्नपाककृती