Lokmat Sakhi >Food > कपभर उरलेल्या भाताचे करा इन्स्टंट कुरकुरीत पेपर डोसे, डब्यासाठी बेस्ट ऑप्शन-खाल पोटभर

कपभर उरलेल्या भाताचे करा इन्स्टंट कुरकुरीत पेपर डोसे, डब्यासाठी बेस्ट ऑप्शन-खाल पोटभर

Instant crispy dosa from leftover rice! : भात खूप उरला असेल तर, त्याचे कुरकुरीत पेपर डोसे तयार करून पाहा. लहानग्यांना नक्की आवडेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2024 11:58 AM2024-02-04T11:58:55+5:302024-02-04T11:59:49+5:30

Instant crispy dosa from leftover rice! : भात खूप उरला असेल तर, त्याचे कुरकुरीत पेपर डोसे तयार करून पाहा. लहानग्यांना नक्की आवडेल

Instant crispy dosa from leftover rice! | कपभर उरलेल्या भाताचे करा इन्स्टंट कुरकुरीत पेपर डोसे, डब्यासाठी बेस्ट ऑप्शन-खाल पोटभर

कपभर उरलेल्या भाताचे करा इन्स्टंट कुरकुरीत पेपर डोसे, डब्यासाठी बेस्ट ऑप्शन-खाल पोटभर

भारतीय थाळी भाताशिवाय (Stale Rice) अपूर्ण आहे. भात हा सर्वांच्याच  घरातील रोजच्या खाण्यातला पदार्थ. भाताशिवाय जेवल्यासारखं वाटत नाही असे अनेक जण म्हणतात. गरमागरम भातासह तूप आणि वरण खाल्ल्याने पोट तुडुंब भरते. पण भात उरला तर, खाण्याची इच्छा होत नाही. उरलेला भात बऱ्याचदा थंड आणि चिकट होतो. बरेच जण उरलेला भात खाणं टाळतात. पण उरलेल्या भाताचं करायचं काय? असा ही प्रश्न निर्माण होतो (Cooking Tips).

बऱ्याच घरांमध्ये फोडणीचा भात तयार करून खातात. पण जर आपल्याला फोडणीचा भात खाऊन कंटाळा आला असेल तर, त्याचे कुरकुरीत पेपर डोसे तयार करा. पेपर डोसे फार कमी लोकांना जमतात (South Indian Style Dosa). जर आपल्याला रोजचा भात आणि डोसा खाऊन कटांळा आला असेल तर, इन्स्टंट पेपर डोसा करून खा(Instant crispy dosa from leftover rice!).

उरलेल्या भाताचे पेपर डोसे करण्यासाठी लागणारं साहित्य

रवा

दही

उरलेला भात

मीठ

ना गॅस-ना पाणी, ५ मिनिटात बटाटे शिजवण्याची हटके ट्रिक, बटाटे शिजतील परफेक्ट

तांदुळाचं पीठ

बेकिंग सोडा

कृती

सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात एक वाटी रवा, एक वाटी दही, एक वाटी उरलेला भात आणि एक वाटी पाणी घालून बॅटर तयार करून घ्या. ज्याप्रमाणे आपण डोश्यासाठी बॅटर तयार करतो. त्याचप्रमाणे बॅटर तयार करा. तयार पीठ एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यावर १५ ते २० मिनिटांसाठी झाकण ठेवा. जेणेकरून पीठ छान फुलेल.

अरे देवा, भातात मीठ घालायलाच विसरले! ही घ्या १ युक्ती, एका मिनिटांत अळणी भाताला येईल चव

२० मिनिटानंतर त्यात अर्धी वाटी तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार पाणी घालून मिक्स करा. शेवटी अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून मिक्स करा. दुसरीकडे नॉन स्टिक तवा गरम करण्यासाठी ठेवा. तवा गरम झाल्यानंतर त्यावर एक चमचा ब्रशने तेल लावा. आता एक चमचा बॅटर घेऊन पसरवा. जर आपल्याला कुरकुरीत डोसा हवा असेल तर, पातळ लेअर तयार करा, व दोन्ही बाजूने भाजून घ्या. अशा प्रकारे इन्स्टंट पेपर डोसा खाण्यासाठी रेडी.

Web Title: Instant crispy dosa from leftover rice!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.