दिवाळीला (Diwali 2024) हमखास फराळ केला जातो (Poha chakli). ज्यात चकली हा पदार्थ आवर्जून केला जातो (Food). चकली खाण्याचा खवय्यावर्ग फार मोठा आहे. चकली अनेक प्रकारचे केले जातात. अधिक करून लोक भाजणीची चकली करतात. पण भाजणी करताना प्रमाण चुकलं की, चकल्याही फसतात. कधी तेलात टाकताच विरघळतात, तर कधी कडक होतात.
चकली करणं वाटतं तितकं सोपं नाही. पण जर ऐनवेळी भाजणी करायला वेळ नसेल तर, आपण पोह्यांची देखील चकली करू शकता. पोह्यांची चकली करण्यासाठी फार वेळ लागत नाही. शिवाय भाजणीचीही गरज लागत नाही. अगदी कमी वेळात पोह्यांची चकली रेडी होते. जर आपल्याला भाजणीची चकली करायला जमत नसेल तर, एकदा पोह्यांची चकली करून पाहा(Instant & Crispy Poha Chakli Recipe | No Soaking try out poha chakli).
पोह्यांची चकली करण्यासाठी लागणारं साहित्य
पोहे
भाजलेली चणा डाळ
तांदुळाचं पीठ
दिवाळीत माधुरी दिक्षितसारखं टवटवीत दिसायचंय? ट्राय करा २ इन्स्टंट फेसपॅक; चेहरा चमकेल - दिसाल सुंदर
लाल तिखट
हळद
ओवा
धणेपूड
जिरेपूड
हिंग
ओवा
पांढरे तीळ
मीठ
पाणी
तेल
कृती
सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यात एक कप पोहे घ्या. त्यात एक कप भाजलेली चणा डाळ घालून वाटून घ्या. एक परात घ्या, त्यावर चालण ठेवा, त्यावर पावडर ओतून चाळून घ्या. नंतर त्यात एक कप तांदुळाचं पीठ, एक चमचा लाल तिखट, हळद, ओवा, धणेपूड, जिरेपूड, हिंग, ओवा, पांढरे तीळ आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.
आता त्यात ३ चमचे गरम तेल घाला, आणि एक कप कोमट पाणी ओतून चमच्याने मिक्स करा. १० मिनिटांसाठी त्यावर प्लेट ठेवा. नंतर पुन्हा अर्धा कप कोमट पाणी ओतून हाताने कणिक मळून घ्या.
उर्वशी रौतेलाने घातलेले ७ डिझाईनर ब्लाऊज, हात-दंडही दिसतात बारीक आणि मिळतो रॉयल लूक
कणिक मळून झाल्यानंतर चकली बनवण्याच्या साच्याला आतील बाजूने ब्रशने तेल लावा. त्यात कणकेचा एक गोळा तयार करून घाला. आणि एका पेपरवर चकली पाडून घ्या.
दुसरीकडे कढईत तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात चकल्या सोडून दोन्ही बाजूने तळून घ्या. अशा प्रकारे पोह्यांची कुरकुरीत चकली खाण्य्साठी रेडी.