आपल्या सगळ्यांच्याच घरात नाश्त्याला बरेचदा 'डोसा' तयार केला जातो. डोसा हा असा पदार्थ आहे जो आपण कधीही खाऊ शकतो. अनेकदा घरी जेवणाला किंवा नाश्त्यासाठी म्हणून तयार केलेला डोसा खाऊन संपतोच असे नाही. डोशाचे पीठ उरलेच तर आपण ते लगेच फ्रिजमध्ये ठेवून त्यानंतर देखील वापरु शकतो. परंतु एकदा (Viral Hack For Turning Leftover Dosa Into Fryums) का डोसा तयार केला आणि जर डोसा खाल्ला गेला नाही तर काहीवेळाने तो कडक होऊ लागतो. असा कडक झालेला डोसा आपण शक्यतो फेकूनच देतो. एकदा तयार करुन ठेवलेला डोसा गरम असतानाच पटकन खाल्ला तर त्याला चव लागते. परंतु जर डोसा तयार करुन बराचवेळ ठेवला तर डोसा गरमही राहत नाही आणि डोसा सुकून देखील कडक होतो. अशावेळी या डोशाच नेमकं करायचं काय ते पाहूयात(Instant Crunchy Fryums With Leftover Dosa).
एकदा तयार करुन ठेवलेला डोसा जर का उरला तर आपण तो फेकून न देता त्यापासून झटपट कुरकुरीत, क्रिस्पी, दुप्पट फुलणारे असे इन्स्टंट पापड करु शकतो. हे पापड आपण जेवतांना तोंडी लावण्यासाठी म्हणून देखील घेऊ शकतो. गरमागरम वरण भातासोबत उरलेल्या डोशाचे पापड कसे करायचे याची झटपट आणि सोपी ट्रिक पाहूयात. यामुळे जर आपल्या घरात एकदा तयार केलेला डोसा चुकून उरलाच तर फेकून न देता त्याचे कुरकुरीत पापड कसे तयार करायचे याची सोपी रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. उरलेला डोसा - गरजेनुसार
२. तेल - तळण्यासाठी
पाहा झटपट कणीक मळण्याची भन्नाट युक्ती, वेळही कमी लागतो, कणिकही होते मऊसूत...
दीपिका पादुकोणला आवडतो तसा ‘रस्सम राइस’ करायचाय? ही घ्या स्पेशल साऊथ इंडियन रेसिपी...
कृती :-
१. सगळ्यात आधी उरलेला डोसा बरोबर मधोमध दुमडून व्यवस्थित कापून घेऊन त्याचे दोन भाग करावेत.
२. त्यानंतर या डोशाचे छोटे लहान लहान मध्यम चौकोनी आकाराचे तुकडे करुन घ्यावेत.
३. आता हे डोशाचे तुकडे एका डिशमध्ये व्यवस्थित पसरवून रात्रभर फ्रिजमध्ये स्टोअर करुन ठेवावेत.
१० मिनिटांत करा सोया चंक्सचा चमचमीत पराठा, सकाळचा नाश्ता - टिफिनसाठी प्रोटीनरीच हेल्दी पर्याय...
४. दुसऱ्या दिवशी हे डोशाचे तुकडे फ्रिजमधून बाहेर काढून थोड्यावेळासाठी तसेच ठेवावेत.
५. त्यानंतर एका कढईत तेल गरम करून त्यात ते डोशाचे तुकडे सोडून तळून घ्यावेत.
उरलेल्या डोशाचे कुरकुरीत, क्रिस्पी, दुप्पट फुलणारे असे इन्स्टंट पापड खाण्यासाठी तयार आहेत.