वातावरणात उष्णता जाणवू लागली की आपण चमचमीत मसालेदार पदार्थ टाळून, साधे पदार्थ खातो. उन्हाळ्यात गरम तिखट पदार्थ खाल्ल्याने पोटात जळजळ होते, शिवाय पोटाचे विकारही वाढतात. मुख्य म्हणजे या काळात शरीरातील पाण्याची पातळी खालावते असेही म्हटले जाते (Kitchen Tips). त्यामुळे आपण अशा पदार्थांचे सेवन करतो, ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असेल. कलिंगड, ज्यूस यासह काकडी देखील आपण आवडीने दररोज खातो (Cooking Tips).
गरम वातावरणात काकडी खाणे फायदेशीर ठरते. काकडी नुसतीच किंवा आपण त्याची कोशिंबीर तयार करून खातो (Cucumber Dhokla). पण आपण कधी काकडीचा ढोकळा करून खाल्ला आहे का? बनवायला सोपी ही रेसिपी आपल्याला नक्की आवडेल, शिवाय हटके पदार्थ खाण्याची इच्छाही पूर्ण होईल(Instant Cucumber Dhokla - Recipe).
काकडीचा ढोकळा करण्यासाठी लागणारं साहित्य
काकडी
तांदुळाचं पीठ
बेसन
दही
नितीन गडकरींनी सांगितली दही वांग्याच्या कापांची हटके-सिंपल रेसिपी, चवीला जबरदस्त
आलं-हिरवी मिरचीची पेस्ट
हळद
धणे पूड
जिरे पूड
बेकिंग सोडा
तेल
जिरे
मोहरी
मीठ
साखर
कृती
सर्वप्रथम, काकडी किसून घ्या. किसलेली काकडी एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात एक कप तांदुळाचं पीठ, अर्धा कप बेसन, एक कप दही, आलं-हिरवी मिरचीची पेस्ट, चवीनुसार मीठ, चिमुटभर हळद, अर्धा चमचा धणे पूड, अर्धा चमचा जिरे पूड, अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून साहित्य मिक्स करा.
ठेचा पाव? ऐकून आश्चर्य आणि तोंडाला पाणी सुटलं ना? झणझणीत ठेचा पाव कसा करायचा? पाहा..
ढोकळा पात्राला ब्रशने तेल लावा, आणि त्यात बॅटर ओतून पसरवा. स्टीमरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात ढोकळा पात्र ठेवून त्यावर १५ मिनिटांसाठी झाकण ठेवा. १५ मिनिटानंतर ढोकळा तयार झाला आहे की नाही हे चेक करा, व त्यावर फोडणी ओतून, ढोकळा कट करून डिश सर्व्ह करा. अशा प्रकारे काकडीचा खमंग ढोकळा खाण्यासाठी रेडी.