दही आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर. दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे रोजच्या आहारात दह्याचा समावेश करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. दही हा पोषक तत्वांचा खजिना आहे. हे कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन बी १२, बी २ पोटॅशियम, मॅग्नेशियम सारख्या आवश्यक पोषक तत्वांचा स्रोत आहे.
आजकाल बरेच कमी लोकं घरात दही लावतात, त्याऐवजी बाजारातील दही खातात. पण बाजारातील दही खाण्यापेक्षा घरात दही तयार करा. अनेकदा घरात दही लावायला वेळ मिळत नाही. किंवा थंडीच्या दिवसात दही लवकर लागत नाही. अशा वेळी दही लवकर तयार होण्यासाठी काय करावे? असा प्रश्न निर्माण होतो. जर आपल्याला झटपट १५ मिनिटात दही ते ही कुकरमध्ये लावायचं असेल तर एका ट्रिकचा वापर करून पाहा. या ट्रिकमुळे १५ मिनिटात ते ही कुकरमध्ये दही तयार होईल(Instant Curd making in Cooker).
कुकरमध्ये दही करण्याची योग्य पद्धत
सर्वप्रथम, मातीचं भांडं स्वच्छ धुवून घ्या. दही नेहमी मातीच्या भांड्यात लावावे. यामुळे ते अधिक काळ टिकते. शिवाय घट्ट तयार होते. दुसरीकडे एका भांड्यात दूध गरम करण्यासाठी ठेवा. दुधाला उकळी येऊपर्यंत मातीच्या भांड्याच्या आतमध्ये दही लावा. नंतर त्यात गरम दूध चमच्याने भरा. मातीच्या भांड्यात दूध भरल्यानंतर त्यावर अॅल्युमिनियम फॉईल लावून पॅक करा.
१ कप चणा डाळ भाजून करा इन्स्टंट खुसखुशीत चकली, झटपट चकली करायलाही सोपी
आता प्रेशर कुकरमध्ये २ कप पाणी घालून गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात मातीचं भांडं ठेऊन कुकरचं झाकण लावा. कुकरचं झाकण लावताना त्यावरून शिट्टी काढा. गॅस लो फ्लेमवर ठेवा. १५ मिनिटानंतर गॅस बंद करा. त्यातून मातीचं भांडं बाहेर काढा. मातीचं भांडं थंड झाल्यानंतर त्यावरून अॅल्युमिनियम फॉईल बाजूला काढा, व चमच्याने दही एका प्लेटमध्ये काढून घ्या. अशा प्रकारे दही खाण्यासाठी रेडी.