Lokmat Sakhi >Food > झटपट ५ मिनिटांत वरण करण्यासाठी तयार करुन ठेवा ‘दाल प्रिमिक्स’, झटपट गरमागरम वरणभात तयार

झटपट ५ मिनिटांत वरण करण्यासाठी तयार करुन ठेवा ‘दाल प्रिमिक्स’, झटपट गरमागरम वरणभात तयार

Instant dal recipe in 5 mins with homemade ready to cook dal premix डाळ लवकर शिजत नाही म्हणून वैतागण्यापेक्षा हा घ्या प्रिमिक्स उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2023 03:31 PM2023-03-28T15:31:51+5:302023-03-28T15:33:10+5:30

Instant dal recipe in 5 mins with homemade ready to cook dal premix डाळ लवकर शिजत नाही म्हणून वैतागण्यापेक्षा हा घ्या प्रिमिक्स उपाय

Instant dal recipe in 5 mins with homemade ready to cook dal premix - ideal for travel & hostel | झटपट ५ मिनिटांत वरण करण्यासाठी तयार करुन ठेवा ‘दाल प्रिमिक्स’, झटपट गरमागरम वरणभात तयार

झटपट ५ मिनिटांत वरण करण्यासाठी तयार करुन ठेवा ‘दाल प्रिमिक्स’, झटपट गरमागरम वरणभात तयार

भारतात डाळ - भात हा पदार्थ प्रचंड फेमस आहे. डाळ - भाताशिवाय जेवण अपूर्ण आहे. वरण, आमटी हे दोन्ही पदार्थ डाळींपासून तयार होतात. डाळ कोणतीही असो, त्याचे सेवन आरोग्यासाठी उत्तमच असते. डाळीचे देखील विविध प्रकार आहेत. विविध डाळीतील विविध फायदे आरोग्याला मिळतात. डाळींमधून अँटिऑक्सिडंट्स, निरोगी चरबी, प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे A, D, E B1, मेथिओनिन, यासह व्हिटॅमिन सी, डी आणि के देखील मिळते.

डाळ बनवणे तसे अवघड नाही, परंतु, डाळ बनवण्यासाठी खूप वेळ लागतो. डाळीच्या फोडणीसाठी लागणारं साहित्य चिरण्यापासून ते फोडणी घालण्यापर्यंत हा वेळ वाचवायचा असेल तर, यासाठी डाळ प्रिमिक्स तयार करून ठेवा. प्रिमिक्स बनवून ठेवल्यानंतर ती अधिक काळ टिकते. हे प्रिमिक्स आपण प्रवास करताना देखील कॅरी करू शकता. या प्रिमिक्समुळे वरण अवघ्या ५ मिनिटात तयार होते(Instant dal recipe in 5 mins with homemade ready to cook dal premix).

डाळ प्रिमिक्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य

तूर डाळ

मुग डाळ

मसूर डाळ

सुकलेलं आलं

तेल

मोहरी

जिरं

हिंग

वांग्याचं अस्सल गावरान चमचमीत भरीत करण्याची खास रेसिपी, करा भरीत-भाकरी बेत

लाल मिरची

कडीपत्ता

तमालपत्र

हिरवी मिरची

कोथिंबीर

कसुरी मेथी

हळद

लाल तिखट

धणे पूड

जिरं पावडर

गरम मसाला

आमचूर पावडर

मीठ

अशा पद्धतीने बनवा डाळ प्रिमिक्स

सर्वप्रथम, एका पॅनमध्य़े १ कप तूर डाळ, १ कप मुग डाळ, पाव कप मसूर डाळ घालून भाजून घ्या. लो फ्लेममध्ये डाळी भाजून घेतल्यानंतर थंड होण्यासाठी ठेवा. डाळी थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या, त्यात सुकलेलं आलं घालून मिश्रण वाटून घ्या.

दुसरीकडे पॅनमध्य़े २ टेबलस्पून तेल गरम करा, त्यात २ चमचे मोहरी, २ चमचे जिरं, अर्धा चमचा हिंग, ४ सुकलेल्या लाल मिरच्या, मुठभर कडीपत्ता, घालून मिश्रण तेलात परतवून घ्या. आता त्यात ३ तमालपत्र, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, कसुरी मेथी, घालून पुन्हा मिश्रण एकत्र करा.

घरच्याघरी विकतसारखे कुरकुरीत पापड हवेत? घ्या खास उडीद पापड मसाला रेसिपी.. पापड होतील परफेक्ट

सगळं साहित्य कुरकुरीत झाल्यानंतर त्यात डाळींचे तयार पीठ, हळद, लाल तिखट, धणे पूड, जिरं पावडर, गरम मसाला, आमचूर पावडर, मीठ, घालून मिश्रण एकत्र करा. २ मिनिटांसाठी या मिश्रणाला खमंग भाजून घ्या. मिश्रण थंड झाल्यानंतर एका प्लास्टिक पिशवीमध्ये घालून सील पॅक करा. अशा प्रकारे डाळ प्रिमिक्स रेडी.

डाळ प्रिमिक्सपासून वरण बनवण्याची पद्धत

एका बाऊलमध्ये प्रिमिक्स घ्या, त्यात पाणी घालून मिश्रण मिक्स करा. डाळ प्रिमिक्सचं हे मिश्रण पॅनमध्य़े घाला व चमच्याने हे मिश्रण ढवळत राहा. ५ मिनिटानंतर उकळी येईल, डाळीला घट्टपणा आलेला दिसेल. अशा प्रकारे होममेड डाळ प्रिमिक्सपासून झटपट वरण खाण्यासाठी रेडी. आपण या वरणावर शेवटी मिरची मोहरीची फोडणी देखील देऊ शकता.

Web Title: Instant dal recipe in 5 mins with homemade ready to cook dal premix - ideal for travel & hostel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.