इडली आणि ढोकळा हे पदार्थ आपल्याकडे नाश्त्याला अगदी आवडीने खाल्ले जातात. इडली आणि ढोकळा हे पदार्थ तर आपण नेहमीच खातो, परंतु या दोन पदार्थांचे कॉम्बिनेशन करुन इडली - ढोकळा असा एक नवीन पदार्थ करता येतो. हा इडली - ढोकळा नवीन पदार्थ दिसायला इडलीच्या आकाराचा गोल पण चवीला मात्र ढोकळ्यासारखा लागतो. त्यामुळे एकाचवेळी इडली आणि ढोकळा असे दोन पदार्थ खाण्याचे समाधान देखील मिळते(Idli Dhokla Recipe).
इडली - ढोकळा हा नवीन पदार्थ घाई गडबडीच्या वेळी अगदी कमी साहित्यात आणि काही मिनिटांत होणारा सोपा पदार्थ आहे. हा झटपट होणारा पदार्थ करायला फारसा वेळ लागत नाही. हा साधासोपा पदार्थ तयार करण्यासाठी इडली - ढोकळ्याप्रमाणे डाळ - तांदूळ भिजवणं, दळणं ही किचकट प्रक्रिया करावी लागत नाही. त्यामुळे इडली - ढोकळ्याचे कॉम्बिनेशन असलेला हा झटपट होणारा नाश्ता एकदा नक्की ट्राय करुन पाहा(Instant Dhokla In Idli Stand).
साहित्य :-
१. बेसन - २ कप
२. मीठ - १/३ टेबलस्पून
३. साखर - १ टेबलस्पून
४. पाणी - गरजेनुसार
५. बेकिंग पावडर - १ टेबलस्पून
६. तेल - २ ते ३ टेबलस्पून
७. जिरे - १/२ टेबलस्पून
८. मोहरी - १/२ टेबलस्पून
९. कडीपत्ता - ८ ते १० पाने
१०. हिरव्या मिरच्या - ४ ते ५
११. लिंबाचा रस - २ टेबलस्पून
१२. पांढरे तीळ - १ टेबलस्पून
१३. कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
साखर आणि मैदा अजिबात न वापरता करा विकतसारखा चोको लाव्हा केक, मुलांच्या आवडीचा खास पदार्थ...
पावसाळ्यात दही आंबट होऊ नये म्हणून काय करायचं? ही घ्या एक खास युक्ती...
कृती :-
१. एका बाऊलमध्ये बेसन घेऊन त्यात चवीनुसार मीठ, साखर घालून मग हळुहळु पाणी घालून ढोकळ्याचे बॅटर बनवून घ्यावे.
२. बॅटर तयार करून झाल्यावर त्यात बेकिंग सोडा व थोडेसे पाणी घालून हे सगळे बॅटर चमच्याने ढवळून एकजीव करुन घ्यावे.
३. इडली करण्याचे इडली पात्र घेऊन त्यात पाणी घालून ते गरम करण्यासाठी ठेवावे.
४. इडलीच्या साच्यांना थोडेसे तेल लावून त्यात हे ढोकळ्याचे बॅटर ओतून घ्यावे.
पराठा चमचमीत करण्यासाठी ही घ्या ‘पराठा मसाला मिक्स’ची खास रेसिपी, ‘असा’ पराठा तुम्ही खाल्लाच नसेल...
५. सगळ्या साच्यांमध्ये बॅटर भरुन झाल्यानंतर हे साचे इडली पात्रात ठेवून त्यांना २० ते २५ मिनिटे वाफेवर स्टीम करुन घ्यावे.
६. आता एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात जिरे, मोहरी, कडीपत्ता, हिरव्या मिरच्या, लिंबाचा रस, पांढरे तीळ, कोथिंबीर व गरजेनुसार पाणी घालून फोडणी तयार करुन घ्यावी.
७. आता इडली पात्रात वाफेवर शिजून घेतलेला ढोकळा काढून घ्यावा.
८. त्यानंतर हा ढोकळा एका डिशमध्ये काढून घेऊन त्यावर तयार केलेली फोडणी ओतून त्यावर ओलं खोबर आणि बारीक चिरेलेली कोथिंबीर भुरभुरवून घ्यावे.
इडलीच्या आकारातील ढोकळा खाण्यासाठी तयार आहे.