रोज नाश्त्याला काय नवीन करायचं असा प्रश्न सर्वांच्या मनात येतो (Khaman dhokla idli). रोजचे नाश्त्याचे पदार्थ खाऊन कंटाळाही येतो. जर घरात पाहुणे आले असतील किंवा घरच्या मंडळीला नाश्त्यासाठी नवीन पदार्थ बनवायचा झाल्यास, आपण इस्टंट इडली ढोकळा ट्राय करू शकता (Breakfast recipe). चविष्ट मसाला इडली ढोकळा काही मिनिटात तयार होतो, शिवाय पौष्टीकही आहे. ज्यांना वेट लॉस करायचं आहे, ते लोक लो कॅलरी ब्रेकफास्ट म्हणूनही हा पदार्थ खाऊ शकता (Cooking Tips).
अत्यंत कमीत कमी साहित्यात आणि कमी वेळेत हा पदार्थ तयार होतो. जर आपल्याला इडली आणि ढोकळ्याचा कॉम्बिनेशन हवं असेल तर, ही रेसिपी नाश्त्याला एकदा ट्राय करून पाहाच. झटपट चवदार, चविष्ट रेसिपी मुलांच्या डब्यालासाठीही बनवून देऊ शकता(instant dhokla in idli stand | idli khaman).
इस्टंट मसाला इडली ढोकळा करण्यासाठी लागणारं साहित्य
रवा
दही
लाल तिखट
हळद
मीठ
गरम मसाला
हिंग
साखर
बेसन
विकतच्या तुपात भेसळ आहे, हे कसे ओळखाल? FSSAI सांगते तूप खाताना २ गोष्टी तपासा, लगेच कळेल
तेल
जिरं
मोहरी
हिंग
कडीपत्ता
इनो
कृती
सर्वात आधी एका बाऊलमध्ये एक कप रवा घ्या. त्यात एक कप दही घालून चमच्याने मिक्स करा. मिक्स करत असताना त्यात अर्धा कप पाणी घाला. नंतर त्यात एक चमचा लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ, गरम मसाला, चिमुटभर हिंग, साखर, एक चमचा बेसन आणि एक चमचा तेल घालून मिक्स करा.
अनुष्का शेट्टीला झालाय हसण्याचा दुर्मिळ आजार; उगाचच हसण्याचा हा आजार नेमका असतो काय?
फोडणीच्या पळीत दोन चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर एक चमचा जिरं, मोहरी, हिंग कडीपत्ता घालून मिक्स करा, तयार फोडणी बॅटरमध्ये ओतून मिक्स करा. त्यावर एका तासासाठी झाकण ठेवा. एका तासानंतर त्यात एक चमचा इनो घालून मिक्स करा.
स्टीमरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवा. इडली पात्राला ब्रशने तेल लावा. त्यात चमचाभर बॅटर ओता. इडली पात्र स्टीमरमध्ये ठेवून झाकण लावा. १५ मिनिटांसाठी वाफेवर इडल्या शिजवून घ्या. अशा प्रकारे इस्टंट मसाला इडली ढोकळा खाण्यासाठी रेडी.