Lokmat Sakhi >Food > फक्त १० मिनिटांत करा भरपूर फुलणारा इन्स्टंट रवा ढोकळा ! घाई गडबडीतही जमेल परफेक्ट नाश्ता...

फक्त १० मिनिटांत करा भरपूर फुलणारा इन्स्टंट रवा ढोकळा ! घाई गडबडीतही जमेल परफेक्ट नाश्ता...

How To Make Instant Dhokla : ढोकळा तयार करण्यासाठी आता मोठा घाट घालण्याची गरज नाही, घ्या इन्स्टंट तवा ढोकळ्याची सोपी रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2023 07:14 PM2023-09-29T19:14:30+5:302023-09-29T19:38:30+5:30

How To Make Instant Dhokla : ढोकळा तयार करण्यासाठी आता मोठा घाट घालण्याची गरज नाही, घ्या इन्स्टंट तवा ढोकळ्याची सोपी रेसिपी...

Instant Dhokla Recipe, How To Make Instant Dhokla Recipe. | फक्त १० मिनिटांत करा भरपूर फुलणारा इन्स्टंट रवा ढोकळा ! घाई गडबडीतही जमेल परफेक्ट नाश्ता...

फक्त १० मिनिटांत करा भरपूर फुलणारा इन्स्टंट रवा ढोकळा ! घाई गडबडीतही जमेल परफेक्ट नाश्ता...

मऊ, लुसलुशीत फुललेला पिवळा धम्मक ढोकळा खाणं सगळ्यांचं आवडत. ढोकळा चवीला जितका सुंदर लागतो तितकाच तो फुलून आला तर खायला देखील मजा येते. ढोकळा हा एक असा पदार्थ आहे जो आपण सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत कधीही खाऊ शकतो. ढोकळा हा प्रामुख्याने गुजरात प्रांतांतील एक मुख्य पदार्थ आहे. परंतु आता हा गुजराती खमण ढोकळा आजकाल सहजपणे कोणत्याही दुकानात खाण्यासाठी सहज मिळतो(Easy Dhokla Recipe Anyone Can Make).

जेव्हा आपण घरी ढोकळा बनवतो तेव्हा तो विकतसारखा मऊ, लुसलुशीत, आणि जाळीदार झाला तरच तो खाण्यात मजा येते. परंतु काहीवेळा ढोकळा बनवण्याच्या आपल्या चुकीच्या पद्धतीमुळे आपला ढोकळा फसतो किंवा मनासारखा होत नाही. अशावेळी ढोकळा मनासारखा न फुलता फसला तर हिरमोड होतो, आणि सगळ्या मेहेनतीवर पाणी फेरल्यासारखे होते. ढोकळा बनवताना पिठाचे प्रमाण, पाणी, तेल, बेकिंग सोडा यांचे गणित चांगले जमून आले तरच ढोकळा हवा तसा फुलून येतो. बहुतांश लोकं ढोकळा एका विशिष्ट भांड्यात तयार करतात, पण आता ढोकळा बनवण्यासाठी मोठा घाट घालण्याची गरज नाही. ढोकळ्याचे इन्स्टंट बॅटर (Dhokla Recipe) बनवून झटपट कढई किंवा पॅनमध्ये देखील ढोकळा बनवू शकतो. त्यांमुळे घाईच्यावेळी किंवा टिफिनसाठी स्नॅक्स म्हणून झटपट ढोकळा बनवण्याची सोपी कृती पाहूयात(Spongy and Soft Instant Dhokla Recipe)

साहित्य :- 

१. बारीक रवा - १ कप 
२. बेसन - १/२ कप 
२. दही - १/२ कप 
३. हिरव्या मिरच्या - १ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
४. हिरवी ढोबळी मिरची - २ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
५. गाजर - १ टेबलस्पून (बारीक तुकडे केलेले)
६. कोथिंबीर - १ टेबलस्पून 
७. हळद - १/२ टेबलस्पून 
८. फ्रुट सॉल्ट - गरजेनुसार 
९. लिंबाचा रस - १ टेबलस्पून 
१०. तेल - २ ते ३ टेबलस्पून 
११. मीठ - चवीनुसार 
१२. मोहरी - १ टेबलस्पून 
१३. कडीपत्ता - ५ ते ६ पाने
१४. हिंग - चिमूटभर 
१५. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून 

कृती :- 

१. सर्वप्रथम एका मोठ्या बाऊलमध्ये बारीक रवा, बेसन, दही घेऊन ते एकत्रित मिक्स करून घ्यावे. 
२. हे मिश्रण चमच्याने ढवळून एकजीव करुन घ्यावे. 
३. आता या तयार ढोकळ्याच्या बॅटरमध्ये बारीक चिरलेली ढोबळी मिरची, गाजर, हिरवी मिरची, कोथिंबीर, चवीनुसार हळद व मीठ घालून सगळे जिन्नस एकजीव करून घ्यावे. 
४. त्यानंतर या मिश्रणांत फ्रुट सॉल्ट व लिंबाचा रस घालून मिक्स करून घ्यावे. 

ढोकळा हवा तसा मनासारखा फुलून येत नाही ? सोडा घालण्याची पद्धत तर चुकत नाही ना...

घरच्याघरी करा परफेक्ट ढोकळा प्रिमिक्स, १० मिनिटांत लुसलुशीत ढोकळा तयार ! पीठ टिकते ६ महिने...

५. आता एका खोलगट कढईमध्ये तेल घेऊन ते मंद आचेवर गरम करून घ्यावे. 
६. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी, हिंग, हळद, कडीपत्ता घालावा, फोडणी घातल्यावर त्यात या ढोकळ्याचे बॅटर गोलाकार आकारात घालावे. 
७. बॅटर घातल्यानंतर त्यावर चिमूटभर लाल तिखट मसाला शिंपडून घ्यावा व शिजवून घेण्यासाठी त्यावर झाकण ठेवावे. 
८. ५ ते १० मिनिटे शिजवून झाल्यावर हा ढोकळा पालटून दुसऱ्या बाजूने शिजवून घ्यावा. 
९. ढोकळा दोन्ही बाजुंनी तयार झाल्यावर एका डिशमध्ये काढून त्याचे सुरीने कापून चौकोनी तुकडे करून घ्यावेत. 

इडली मऊ लुसलुशीत होण्यासाठी पीठ भिजवताना घाला फक्त १ गोष्ट; इडली फुगेल टम्म...

अशाप्रकारे आपला इन्स्टंट तवा ढोकळा खाण्यासाठी तयार आहे. हा ढोकळा हिरव्या चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करावा.

Web Title: Instant Dhokla Recipe, How To Make Instant Dhokla Recipe.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.