गुजराथचे अनेक पदार्थ फेमस आहेत (Gujrathi Dishes). ज्यात हलका - फुलका खमण ढोकळा हा आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ आहे. खमण ढोकळा हा पदार्थ बहुतांश जण नाश्त्याला खातात (Cooking Tips). स्पॉन्जी आणि मऊ ढोकळा खूप चविष्ट लागतो आणि याची चव मोठेचं नाही तर मुलांनाही आवडते. घरात कोणी पाहुणे आले तर खमन ढोकळा (Khaman Dhokla) चहासोबत देता येतो. पण खमण ढोकळा बनवायला बराच वेळ जातो. शिवाय काही वेळेस खमण ढोकळा फसतो.
योग्य साहित्यांचे प्रमाणाचे वापर करून खमण ढोकळा तयार केल्यास परफेक्ट बनतो. शिवाय बाजारात मिळतो तसा मऊ आणि चविष्ट होतो. जर आपल्याला झटपट खमण ढोकळा करायचा असेल तर, ग्लासमध्ये ढोकळा तयार करून पाहा. अगदी काही वेळात खमण ढोकळा तयार होईल(Instant Dhokla recipe in glass- No Eno No curd | Instant Nashta).
ग्लास खमण ढोकळा करण्यासाठी लागणारं साहित्य?
बेसन
मीठ
जेवणानंतर 'ही' चूक केली तर पश्चाताप अटळ, वजन वाढते झरझर! ५ मिनिटं ‘एवढं’ करा...
हळद
सायट्रिक अॅसिड
तेल
इनो
कृती
सर्वात आधी एका बाऊलमध्ये ३ कप पाणी घ्या. त्यात एक चमचा साखर, अर्धा चमचा मीठ, चिमुटभर हळद, अर्धा चमचा सायट्रिक अॅसिड घालून साहित्य मिक्स करा. पाण्यात साखर विरघळल्यानंतर त्यात एक कप बेसन घालून मिक्स करा. बॅटर जास्त घट्ट नसून पातळ असावे. नंतर त्यावर १० मिनिटांसाठी झाकण ठेवा.
आता स्टीमरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवा. त्यावर एक स्टॅण्ड ठेवा. आणि त्यावर झाकण लावा. बॅटरमध्ये एक चमचा तेल घाला आणि बिटरने मिक्स करा. एक ग्लास घ्या, त्याला ब्रशने आतील बाजूस तेल लावा. बॅटरमध्ये एक चमचा इनो घाला, आणि मिक्स करा. बॅटर फ्लफी झाल्यानंतर ग्लासमध्ये ओता. आणि ग्लास स्टीमरमध्ये ठेवा.
भाजलेले की भिजवलेले? चणे नेमके कसे - केव्हा खाणे योग्य? वजन कमी करायचा फायदा हवा तर..
३० मिनिटांसाठी वाफेवर ढोकळा शिजवून घ्या. गॅस मिडीयम फ्लेमवर ठेवा. ३० मिनिटांनंतर ढोकळा शिजला आहे की नाही हे चेक करा. शिजला असेल तर बाहेर काढून ठेवा. थंड झाल्यानंतर ग्लासमधून बाहेर काढा, व सुरीने त्याचे काप करा. त्यावर फोडणी ओतून ढोकळा खायला द्या.