अनेकदा घरात जेवण शिल्लक राहते. आपण बाहेरून काहीतरी खाऊन येतो. किंवा आई एक्स्ट्रा चपात्या करते. त्यामुळे साधारण चपात्या व भात शिल्लक राहते. चपात्या शिल्लक राहिल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी कडक होऊन जातात. त्यामुळे शिळ्या चपात्या खाणं लोकं टाळतात. शिळ्या चपात्यांचे अनेक प्रकार केले जातात. फोडणीची पोळी, गुळ - तूप घालून लाडू, हे पदार्थ आवडीने खाल्ले जातात. पण आपणा कधी शिळ्या चपात्यांचे डोसे खाल्ले आहेत का?
डोसा करण्यासाठी डाळ - तांदूळ भिजत घालावे लागते. व त्यानंतर त्याचे वाटण करून डोसे तयार केले जाते. ही प्रोसेस खूप मोठी आहे. जर आपल्याला झटपट डोसे तयार करून खायचं असेल, व घरी शिळ्या चपात्याही शिल्लक राहिल्या असतील तर, ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहा. क्रिस्पी - चविष्ट डोसे कमी साहित्यात - कमी वेळात तयार होतात. चला तर मग या कुरकुरीत पदार्थाची कृती पाहूयात(Instant Dosa from leftover Roti / breakfast recipe).
शिळ्या चपातीचा डोसा करण्यासाठी लागणारं साहित्य
चपाती
रवा
नाश्त्याला करा इन्स्टंट रवा ढोकळा, गुजराथी रेसिपी करायला सोपी - पोटभर आणि पौष्टिक
दही
मीठ
कृती
सर्वप्रथम, शिळ्या चपात्यांचे तुकडे करा, व हे तुकडे एका ताटात किंवा वाटीत घ्या. यात पाणी मिसळून १० मिनिटांसाठी झाकण ठेऊन काही वेळ भिजत ठेवा. यामुळे चपात्या मऊ होतील. १० मिनिटं झाल्यानंतर मिक्सरचं भांडं घ्या, त्यात पाण्यासकट भिजलेली चपाती, एक कप रवा, अर्धा कप दही घालून मिक्सरमधून वाटून घ्या.
२ चमचे तांदळाची करा इन्स्टंट खीर, १५ मिनिटांत मस्त गोड खिर तय्यार, चवीलाही बेस्ट
पेस्ट तयार झाल्यानंतर एका वाटीत काढून घ्या. त्यात एक चमचा मीठ घालून मिक्स करा. आता नॉन स्टिक तवा गरम करण्यासाठी ठेवा, थोडे तेल लावून पसरवा. व त्यावर तयार चपातीचं बॅटर पसरवून डोसा तयार करा. व दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या. अशा प्रकारे शिळ्या चपातीचा डोसा खाण्यासाठी रेडी. आपण हा डोसा चटणीसोबत खाऊ शकता.