Lokmat Sakhi >Food > एकदाच बनवून ठेवा हे डोसा प्रिमिक्स आणि अगदी १० मिनिटांत करा उडुपी डोसा...

एकदाच बनवून ठेवा हे डोसा प्रिमिक्स आणि अगदी १० मिनिटांत करा उडुपी डोसा...

Instant Dosa Recipe : Instant Dosa Mix : ना डाळ - तांदूळ भिजत घालायची झंझट, ना पीठ आंबवण्याचे टेंन्शन तरीही परफेक्ट कुरकुरीत डोसा बनवायला सोपा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2024 08:59 AM2024-06-29T08:59:48+5:302024-06-29T09:09:54+5:30

Instant Dosa Recipe : Instant Dosa Mix : ना डाळ - तांदूळ भिजत घालायची झंझट, ना पीठ आंबवण्याचे टेंन्शन तरीही परफेक्ट कुरकुरीत डोसा बनवायला सोपा...

instant dosa premix recipe instant dosa using dosa ready mix Dosa premix powder recipe How to make dosa powder premix powder | एकदाच बनवून ठेवा हे डोसा प्रिमिक्स आणि अगदी १० मिनिटांत करा उडुपी डोसा...

एकदाच बनवून ठेवा हे डोसा प्रिमिक्स आणि अगदी १० मिनिटांत करा उडुपी डोसा...

सकाळच्या नाश्त्यात आपण बहुतेकवेळा डोसा, इडली, मेदू वडा असे पदार्थ बनवतो. भारतात साऊथ इंडियन खाद्यपदार्थांमधील डोसा खूपच फेमस आहे. तव्यावर मस्त गरमागरम खरपूस भाजलेला डोसा (Dosa Premix Tasty Crispy Dosa Just add water No Soda) खाणं म्हणजे सुख. हा कुरकुरीत डोसा चटणी आणि सांबर सोबत खायला आणखीनच छान लागतो. खरंतर, एकच बॅटर वापरुन डोशाचे अनेक प्रकार बनवता येतात. 

डोसा करायचा म्हटलं की आधी डाळ, तांदूळ भिजत घालून त्याचे पीठ तयार करावे लागते. हे पीठ आंबवून घ्यावे लागते. डोसा बनवायचा म्हटलं की त्याची जय्यत तयारी करावी लागते. प्रत्येकवेळी आपल्याकडे इतकी तयारी करण्यासाठी वेळ असतोच असे नाही. अशावेळी झटपट डोसे तयार करण्याचा कोणता सोपा उपाय (How to make dosa premix powder) असायला हवा, असे वाटते. अशा परिस्थिती, आपण डोसा प्रिमिक्स एकदाच बनवून ठेवू शकतो. हे तयार डोसा प्रिमिक्स वापरुन आपण अगदी आयत्यावेळी १० मिनिटांत उडुपी स्टाईलने डोसा बनवू शकतो. हे डोसा प्रिमिक्स (Dosa premix powder recipe) बनवण्याची सोपी रेसिपी पाहूयात(instant dosa premix recipe instant dosa using dosa ready mix)

साहित्य :- 

१. तांदूळ - २ कप 
२. पांढरी उडीद डाळ - १ कप 
३. चणा डाळ - १ कप 
४. पोहे - १ कप 
५. मेथी दाणे - १ टेबलस्पून 
६. मीठ - १ टेबलस्पून 

कृती :- 

१. एका पॅनमध्ये तांदूळ, पांढरी उडीद डाळ, चणा डाळ, पोहे, मेथी दाणे हे सर्व जिन्नस एकत्रित करुन कोरडे भाजवेत. 
२. हे संपूर्ण मिश्रण हलकासा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत चांगले भाजून घ्यावे. 
३. त्यानंतर हे मिश्रण थोडे गार होऊ द्यावे. आता हे मिश्रण मिक्सरमध्ये वाटून त्याची बारीक पूड करावी. 
४. आपले डोसा प्रिमिक्स तयार आहे, यात थोडेसे मीठ घालून मिश्रण व्यवस्थित मिक्स करुन एका हवाबंद डब्यांत स्टोअर करुन ठेवावे. 

लाटताना चपाती पोळपाट किंवा लाटण्याला चिकटू नये म्हणून सोप्या ६ टिप्स, करा परफेक्ट गोल चपाती... 

वाटीभर सुक्या खोबऱ्याची करा झणझणीत चटणी, तोंडी लावण्यासाठी म्हणून परफेक्ट...

या प्रिमिक्स पासून डोसे कसे करावेत ? 

१. हे प्रिमिक्स वापरुन डोसे तयार करताना एका बाऊलमध्ये हवे तेवढे प्रिमिक्स काढून घ्यावे. 
२. त्यात दही, चवीनुसार मीठ व गरजेनुसार पाणी घालून बॅटर व्यवस्थित ढवळून घ्यावे. 
३. आता या भांड्यावर झाकण ठेवून १५ ते २० मिनिटे हे बॅटर तसेच ठेवावे. 
४. गरम तव्याला तेल लावून त्यावर हे बॅटर घालून डोसे दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्यावेत. 

डोसा प्रिमिक्स वापरुन झटपट होणारे डोसे खाण्यासाठी तयार आहेत.

Web Title: instant dosa premix recipe instant dosa using dosa ready mix Dosa premix powder recipe How to make dosa powder premix powder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.