Join us  

डाळ तांदूळ न वाटता-न आंबवता १० मिनिटांत करा पौष्टीक डोसा; सोपी रेसिपी-झटपट नाश्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 12:59 PM

Instant Dosa Recipe : तांदूळ निवडण्यापासून दळण्यापर्यंत, आंबवण्याची प्रक्रिया यासाठी खूप काही करावं लागतं. (Instant Dosa Recipe)

नाश्त्याला काहीतरी वेगळं खावसं वाटलं तर नेहमीच डोसा, इडली असे पदार्थ खाल्ले जातात.  दक्षिण भारतीय पदार्थ नाश्त्याला मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. (Quick Dosa Recipe) पण मेदूवडा, इडली, डोसा हे पदार्थ घरी बनवायचं म्हटलं की बरीच कामं करावी लागतात. तांदूळ निवडण्यापासून दळण्यापर्यंत, आंबवण्याची प्रक्रिया खूप काही करावं लागतं. (Instant Dosa Recipe)

इतका वेळ सर्वांनाच मिळतो असं नाही. तांदूळ डाळ न भिजवता, न आंबवता सोप्या पद्धतीने डोसा कसा तयार करायचा ते पाहूया. (How to make instant Dosa in just 10 minutes) हा  इस्टंट डोसा पौष्टीक तसंच चवीला अप्रतिम लागतो. यात वेगवेगळ्या डाळींचा समावेश असल्यामुळे हा डोसा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच चवीला उत्तम आहे. (What is instant dosa mix made of)

साहित्य

१) तांदूळ- १ कप

२) मसूर डाळ - अर्धा कप

३) मूग डाळ- अर्धा कप

४) चणा डाळ- अर्धा कप

५) उडीदाची डाळ- अर्धा कप

६) लाल मिरच्या -३  ते ४

७) हिंग- पाव चमचा

८) कढीपत्ता - १० ते १५ 

९) मीठ- चवीनुसार

१०) पाणी- १  ते दीड कप

११) तेल- गरजेनुसार

कृती

१) डाळींचा पौष्टीक डोसा बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका भांड्यात तांदूळ घ्या. त्यात चण्याची डाळ, मसूर डाळ, मूग डाळ घाला उडीदाची डाळ घालू शकता. डाळींच्या मिश्रणात पाणी घालून ५ ते ६ तांसासाठी भिजवून ठेवा.  त्यात लाल मिरच्या, हिंग, कढीपत्ता घालून मिक्सरच्या भांड्यात घालून व्यवस्थित वाटून घ्या. तयार मिश्रण एका वाडग्यात काढा. 

२) त्यात चवीनुसार मीठ घाला. हे मिश्रण एकजीव करून बॅटर १५ ते २० मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्या. त्यानंतर एका नॉनस्टीक तव्याला तेल लावून त्यावर डोशाचं मिश्रण पसरवा. एका बाजूने डोसा शिजल्यानंतर थोडं तेल घालून डोसा फिरवून घ्या. तयार आहे कुरकुरीत डोसा.

वरण-भाताबरोबर खायला पटकन करा खमंग बटाटा फ्राय; सोपी रेसिपी, साध्या जेवणाची वाढेल चव

३) डोसा छान फुलण्यासाठी तुम्ही त्यात सोडा घालू शकता किंवा इनो वापरू शकता.  डोश्याच्या पीठात भिजवलले पोहे दळून घातल्याने किंवा अर्धा कप रवा घातल्यानेही चांगले टेक्चर मिळेल आणि डोसा जाडसर होईल. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स