Lokmat Sakhi >Food > ना रवा - ना इनो; १० मिनिटात इन्स्टंट कुरकुरीत डोसा करण्याची सोपी कृती; नाश्ता होईल झटपट

ना रवा - ना इनो; १० मिनिटात इन्स्टंट कुरकुरीत डोसा करण्याची सोपी कृती; नाश्ता होईल झटपट

instant dosa with rice flour | chawal ke aate ka dosa : डाळ - तांदुळाच्या बॅटरशिवाय इन्स्टंट क्रिस्पी डोसा कसा करायचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2024 02:20 PM2024-05-29T14:20:53+5:302024-05-29T14:22:32+5:30

instant dosa with rice flour | chawal ke aate ka dosa : डाळ - तांदुळाच्या बॅटरशिवाय इन्स्टंट क्रिस्पी डोसा कसा करायचा?

instant dosa with rice flour | chawal ke aate ka dosa | ना रवा - ना इनो; १० मिनिटात इन्स्टंट कुरकुरीत डोसा करण्याची सोपी कृती; नाश्ता होईल झटपट

ना रवा - ना इनो; १० मिनिटात इन्स्टंट कुरकुरीत डोसा करण्याची सोपी कृती; नाश्ता होईल झटपट

नाश्ता म्हटलं की, सगळे जण साऊथ इंडियन पदार्थ आवर्जून खातात (South Indian Dish). इडली, सोडा, मेदू वडे, आप्पे त्या सोबत चटणी आवडीने लोक खातात. पण बहुतांश लोकांना साऊथ इंडियन स्टाईल डोसा खायला आवडतो (Dosa Recipe). मात्र, डोसा बनवण्याची प्रक्रिया खूप मोठी आहे (Cooking Tips). डाळ - तांदूळ भिजत घालण्यापासून ते आंबवण्यापर्यंत.

बॅटर रात्रभर फुगल्याशिवाय डोश्याला चव येत नाही. शिवाय टेक्शरही छान येत नाही. पण जर आपण घाईत असाल आणि नाश्त्याला डोसाच खायचं असेल तर, १० मिनिटात अण्णाच्या ठेल्यावर मिळतो तसा डोसा तयार करा. डाळ - तांदुळाच्या बॅटरशिवाय आपण झटपट क्रिस्पी डोसा तयार करू शकता. डोश्याच्या बॅटरशिवाय डोसा नेमका कसा करायचा पाहूयात(instant dosa with rice flour | chawal ke aate ka dosa).

डाळ - तांदुळाच्या बॅटरशिवाय डोसा - १० मिनिटात इन्स्टंट डोसा रेडी

लागणारं साहित्य

तांदुळाचं पीठ

बेसन

मीठ

साखर

बटाट्याचे तुकडे

खात्यात फक्त ३००० रुपये होते, पोटासाठी काम केलं कारण..कान्समध्ये पुरस्कार मिळवणारी अभिनेत्री कानी कुसरुती सांगते..

लाल मिरची

दही

पाणी

लसूण

बेकिंग सोडा

कृती

इन्स्टंट डोसा करण्यासाठी सर्वात आधी मिक्सरचं भांडं घ्या. त्यात एक कप तांदुळाचं पीठ, अर्धा कप बेसन, चवीनुसार मीठ, आवडीनुसार साखर, बटाट्याचे काही तुकडे, एक लाल मिरची, २ लसणाच्या पाकळ्या, अर्धा कप दही आणि पाणी घालून साहित्य वाटून घ्या.

कुंडीतल्या रोपाची पानं कोमेजतात? झाडाची वाढ खुंटते? ग्लासभर ताकाचा उपाय - फळे फुले येतील जोमात

तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात छोटा अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि २ चमचे पाणी घालून मिक्स करा. ५ मिनिटांसाठी त्यावर झाकण ठेवा. नॉन - स्टिक तवा गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. त्यावर ब्रशने थोडे तेल लावा. गॅस मिडीयम फ्लेमवर ठेवा. त्यावर चमचाभर बॅटर ओतून पसरवा.

बॅटर तव्यावर पसरवल्यानंतर त्यावर झाकण ठेवा. २ मिनिटानंतर डोश्यावर अर्धा चमचा तेल सोडा. दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या. अशाप्रकारे डाळ - तांदुळाच्या बॅटरशिवाय कुरकुरीत डोसा खाण्यासाठी रेडी.

Web Title: instant dosa with rice flour | chawal ke aate ka dosa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.