वरण, भात, भाजी, पोळी असा सगळा स्वयंपाक असला तरी जोपर्यंत पानात लोणचं, चटणी, कोशिंबीर असे पदार्थ येत नाहीत, तोपर्यंत जेवण काही रंगत नाही. भाजी, वरण कितीही चवदार असली तरी या पदार्थांची आठवण हमखास येतेच. म्हणूनच तोंडी लावण्यासाठी एखाद्यावेळी चटपटीत लसूण लोणचं करून पाहा (lasun loncha). तुमच्याकडे जर लसूण सोलून तयार असेल तर अवघ्या ५ मिनिटांचा वेळही या लोणच्यासाठी पुरेसा आहे (how to make garlic pickle). लसूण उष्ण असतो. त्यामुळे थंडीच्या दिवसांत तो आवर्जून खायलाच पाहिजे. त्यामुळे हिवाळ्यात ही रेसिपी तुमच्या खूपच उपयोगी येणारी आहे.(instant garlic achar recipe by Kunal Kapoor)
इंस्टंट लसूण लोणचं रेसिपी
साहित्य
३ टेबलस्पून लसूण पाकळ्या
१ टीस्पून मेथ्या
१ टीस्पून बडिशेप
मुलं सारखी चिडतात, ओरडून बोलतात? 'ही' युक्ती करून पाहा, राग शांत होऊन प्रेमाने बोलू लागतील
१ टीस्पून कलौंजी
१ टीस्पून मोहरी
चिमूटभर हिंग
१ टीस्पून तिखट, हळद
केस धुण्यासाठी 'हे' पाणी वापरा! झाडूसारखे कोरडे केस होतील मऊ- चमकदार, वाढतीलही भराभर
एका लिंबाचा रस
चवीनुसार मीठ
२ टेबलस्पून तेल आणि ३ ते ४ लाल वाळलेल्या मिरच्या
कृती
१. सगळ्यात आधी तर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा.
२. तेल गरम झाल्यानंतर मोहरी, मेथ्या, हिंग, बडिशेप, कलौंजी आणि लाल मिरच्या टाकून फोडणी करून घ्या.
Children's Day: अनुष्का शर्माने मुलांसाठी केला खास पदार्थ! लेकरांसाठी ‘असे’ केले मिलेट नूडल्स
३. त्यानंतर त्यामध्ये लसूण पाकळ्या, मीठ, तिखट आणि लिंबाचा रस घाला.
४. लसूण बऱ्यापैकी परतून झाला की गॅस बंद करा. लसूण करपून जाणार नाही याची मात्र काळजी घ्या.
५. हे लोणचं एअरटाईट डब्यात घालून फ्रिजमध्ये ठेवल्यास आठवडाभर चांगलं राहतं.