Join us  

तोंडी लावायला ५ मिनीटांत करा लसणाचं झणकेदार लोणचं, जेवणाची लज्जत वाढवणारी सोपी रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2023 5:02 PM

Instant Garlic Pickle Recipe : तोंडाला चव आणणारे आणि आरोग्यासाठी फायदेशीर लोणच्याची रेसिपी...

भारतीय स्वयंपाकात लसूण आवर्जून वापरला जाणारा मसाल्याचा पदार्थ आहे. पदार्थाला स्वाद येण्यासाठी तर आपण लसून वापरतोच पण आरोग्यासाठी लसूण खाणे अतिशय फायदेशीर असते. म्हणून आपण विविध पदार्थांना फोडणी देण्यासाठी लसणाच्या पाकळ्यांचा वापर करतो. इतकेच नाही तर आपण तोंडी लावायला लसूण आणि दाण्याची चटणीही करतो. चांगले कोलेस्टेरॉल वाढण्यासाठी आणि बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आवर्जून लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो. डायबिटीस, ब्ल़ प्रेशर आणि इतरही काही समस्या कमी करण्यासाठी लसूण खाणे उपयुक्त असते. कफ कमी होण्यासाठी, लठ्ठपणा कमी करण्यासाठी तसेच प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी लसूण खाणे उपयुक्त असते. याच लसणाचे घरच्या घरी अगदी झटपट होणारे लोणचे जेवणाची चव तर वाढवतेच पण आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. अगदी ५ मिनीटांत होणारे हे झणकेदार लोणचे कसे करायचे पाहूया. (Instant Garlic Pickle Recipe)..

साहित्य - 

१. मोहरीचं तेल - अर्धी वाटी

२. मेथ्या - २ चमचे 

(Image : Google)

३. मोहरी - १ चमचा 

४. बडीशोप - १ चमचा 

५. कलौंजी - २ चमचे 

६. लाल मिरची - ३ ते ५

७. कडीपत्ता - १० ते १२ पानं

८. लसूण - २० ते २५ पाकळ्या

९. मीठ - चवीनुसार 

१०. हळद - पाव चमचा 

११. तिखट - अर्धा चमचा 

१२. व्हिनेगर - पाव वाटी 

साहित्य -

१. लसूण सोलून घ्यावा आणि कढईमध्ये तेल गरम करायला ठेवावे.

२. तेल तापले की त्यामध्ये मोहरी, मेथ्या आणि बडीशोप घालावी.

३. हे चांगले तडतडले की त्यामध्ये कलौंजी, लाल मिरच्या आणि कडीपत्ता घालावा. 

४. सगळे चांगले परतून मग लसूण पाकळ्या घालाव्यात. त्यावर मीठ, हळद आणि लाल तिखट घालावे.

५. सगळ्यात शेवटी व्हिनेगर घालून सगळे चांगले एकजीव करावे. 

६. वरण भात, पोळी कशासोबतही हे लोणचे खायला अतिशय चविष्ट लागते.

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.