Lokmat Sakhi >Food > पीठ -मीठ -पाणी आणि ५ मिनिटात करा जाळीदार घावन, मऊ लुसलुशीत घावनांची मजाच न्यारी..

पीठ -मीठ -पाणी आणि ५ मिनिटात करा जाळीदार घावन, मऊ लुसलुशीत घावनांची मजाच न्यारी..

Instant Ghavan recipe | Rice Flour Crepes in 5 minutes कमी साहित्यात - झटपट बनवा मऊ लुसलुशीत घावणे, ५ मिनिटात डिश रेडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2023 04:08 PM2023-04-11T16:08:00+5:302023-04-11T16:08:52+5:30

Instant Ghavan recipe | Rice Flour Crepes in 5 minutes कमी साहित्यात - झटपट बनवा मऊ लुसलुशीत घावणे, ५ मिनिटात डिश रेडी

Instant Ghavan recipe | Rice Flour Crepes in 5 minutes | पीठ -मीठ -पाणी आणि ५ मिनिटात करा जाळीदार घावन, मऊ लुसलुशीत घावनांची मजाच न्यारी..

पीठ -मीठ -पाणी आणि ५ मिनिटात करा जाळीदार घावन, मऊ लुसलुशीत घावनांची मजाच न्यारी..

घावणे हा पदार्थ महाराष्ट्रातील प्रत्येक घरात बनला जातो. खासकरून कोकण भागात हा पदार्थ आवडीने खातात. घावणे हा पदार्थ तांदळाच्या पिठाचा वापर करून तयार होतो. त्याच्यासोबत खोबऱ्याची चटणी अप्रतिम लागते. घावणे हा पौष्टीक पदार्थ आहे. २ - ३ घावणे खाल्ल्याने पोट टम्म भरते. सतत चपाती - भाकरी खाऊन घरातील सदस्यांना कंटाळा येतो. त्यांना जर हटके काहीतरी खाण्याची इच्छा होत असेल तर, तांदळाच्या पीठाचे झटपट घावणे तयार करा.

गरमा - गरम घावणे काही मिनिटात तयार होते. हा पदार्थ जितका बनवायला सोपा वाटतो, तितका अजिबात नाही आहे. योग्य प्रमाणात आवश्यक साहित्यांचा वापर केल्यास घावणे उत्तम बनतात. चला तर मग या झटपट जाळीदार - लुसलुशीत पदार्थाची कृती पाहूयात(Instant Ghavan recipe | Rice Flour Crepes in 5 minutes).

घावणे बनवण्यासाठी लागणारं साहित्य

तांदळाचं पीठ 

मीठ 

पाणी

एक कप साबुदाणा - एक किलो बटाट्याचे बनवा लच्छा पापड, क्रिस्पी पापड - टिकतील वर्षभर

अशा पद्धतीने बनवा घावणे

सर्वप्रथम, गॅसवर लोखंडी तवा लो प्लेमवर गरम करायला ठेवा. दुसरीकडे एका मोठ्या बाऊलमध्ये एक वाटी तांदळाचं पीठ घ्या. त्यात १ वाटी पाणी घालून मिक्स करा. व त्यानंतर थोडं - थोडं करून आणखी एक वाटी पाणी घालून मिश्रण मिक्स करा. पीठ तयार करताना पीठाच्या गाठी तयार होणार नाही याची काळजी घ्या. व हे पीठ एकदम पातळ तयार करायचे आहे.

विकेंडला बनवा खमंग पारंपारिक पाटवडी, कमी साहित्यात - कमी वेळात डिश तयार

मिश्रण तयार झाल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालून बॅटर तयार करा. पीठ तयार झाल्यानंतर गॅस हाय फ्लेमवर ठेवा, व तव्यावर ब्रशने किंवा अर्धा कांदा कापून त्याने तेल ग्रीस करा. आता एका छोट्या वाटीने बॅटर ढवळून तव्यावर घावण तयार करा. त्यावर झाकण ठेऊन १० ते १५ सेकंद वाफ द्या. १५ सेकंद झाल्यानंतर झाकण काढून गॅस मध्यम आचेवर करून घावण पलटी करा, व दोन्ही बाजूने भाजून घ्या. अशा प्रकारे मऊ - लुसलुशीत जाळीदार घावणे खाण्यासाठी रेडी.

Web Title: Instant Ghavan recipe | Rice Flour Crepes in 5 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.