Lokmat Sakhi >Food > हिरव्यागार मटारचे पौष्टिक आप्पे - हिवाळ्यातला खास चविष्ट बेत, करायलाही एकदम सोपा बेत...

हिरव्यागार मटारचे पौष्टिक आप्पे - हिवाळ्यातला खास चविष्ट बेत, करायलाही एकदम सोपा बेत...

Instant Green Peas Appe : Matar Appe Recipe : How To Make Matar Appe At Home : Winter Special Matar Appe : कपभर मटारचे होतील पौष्टिक आप्पे; सकाळचा नाश्ता होईल १० मिनिटांत झटपट रेडी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2025 08:41 IST2025-01-14T08:40:56+5:302025-01-14T08:41:43+5:30

Instant Green Peas Appe : Matar Appe Recipe : How To Make Matar Appe At Home : Winter Special Matar Appe : कपभर मटारचे होतील पौष्टिक आप्पे; सकाळचा नाश्ता होईल १० मिनिटांत झटपट रेडी...

Instant Green Peas Appe Matar Appe Recipe How To Make Matar Appe At Home | हिरव्यागार मटारचे पौष्टिक आप्पे - हिवाळ्यातला खास चविष्ट बेत, करायलाही एकदम सोपा बेत...

हिरव्यागार मटारचे पौष्टिक आप्पे - हिवाळ्यातला खास चविष्ट बेत, करायलाही एकदम सोपा बेत...

सकाळच्या नाश्त्याला गरमागरम आप्प्यांसोबत हिरवीगार खोबऱ्याची चटणी असली की, आपण पोटभर नाश्ता करतो. आप्पे हा खरंतर दाक्षिणात्य पदार्थ असला तरीही आजकाल (Instant Green Peas Appe) हा इतका कॉमन पदार्थ झाला आहे की तो सर्रास सगळ्यांच्याच घरात नाश्त्याला हमखास केला जातो. वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारचे आप्पे (Matar Appe Recipe) तयार केले जातात. आप्प्यांमध्ये रव्याचे आप्पे, डाळ - तांदुळाचे आप्पे, गोड - तिखट आप्पे (How To Make Matar Appe At Home) असे असंख्य प्रकार आहेत. आपण बहुतेकवेळा सकाळच्या नाश्त्याला आप्पे खातोच, परंतु नेहमीचे तेच ते एकाच पद्धतीचे आप्पे खाऊन कंटाळा आला असेल तर आपण यंदाच्या हिवाळ्यात मटारचे आप्पे नक्की घरच्याघरीच तयार करु शकतो(Winter Special Matar Appe).

थंडीचा सिझन म्हटलं की बाजारांत हिरवेगार, टप्पोरे, फ्रेश मटार विकायला असतात. या हिवाळ्यात येणाऱ्या मटारचे अनेक पदार्थ घरोघरी तयार केले जातात. मटार पराठा, मटार पुलाव, मटार उसळ, मटार करंजी - कचोरी असे अनेक पदार्थ तर करतोच. तेव्हा यंदाच्या हिवाळ्यात झटपट तयार होणारे मटारचे पौष्टिक आप्पे नक्की करुन पाहा. मटारचे आप्पे तयार करण्याची सोपी रेसिपी पाहूयात.

साहित्य :- 

१. हिरवे मटार - १ कप 
२. हिरव्या मिरच्या - ३ ते ४ (बारीक चिरलेल्या)
३. कोथिंबीर - १/२ कप 
४. रवा - १ कप 
५. दही - १ कप 
६. मीठ - चवीनुसार 
७. मका - १/२ कप  
८. पनीर - १/२ कप (किसून घेतलेले)
९. काळीमिरी पूड - १ टेबलस्पून 
१०. ऑरगॅनो - १ टेबलस्पून 
११. चिलीफ्लेक्स -  १ टेबलस्पून 
१२. ढोबळी मिरची - १/२ कप 
१३. चीज - ३ ते ४ टेबलस्पून 
१४. तेल - गरजेनुसार 
१५. पाणी - गरजेनुसार 
१६. इनो - १ टेबलस्पून 

ना टिश्यू पेपर, ना एअर टाईट कंटेनर - फ्रिजशिवायही कडीपत्ता टिकून राहील ६ महिने, बघा ही भन्नाट ट्रिक...


हिवाळ्यात स्वस्त मिळतात मटार, घरी ‘असे’ करा फ्रोजन मटार, रंग आणि स्वाद वर्षभर टिकेल...

कृती :- 

१. सगळ्यात आधी एका मिक्सरच्या भांड्यात हिरवे मटार, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर घालून सगळे जिन्नस मिक्सरमध्ये एकत्रित वाटून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. त्यानंतर त्यात बारीक रवा, दही आणि चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा हे सगळे जिन्नस मिक्सरमध्ये एकत्रित फिरवून घ्यावे. अशा प्रकारे आप्पे करण्यासाठीचे हिरव्या मटारचे बॅटर तयार करून घ्यावे. तयार बॅटर एका बाऊलमध्ये काढून ते १५ ते २० मिनिटे झाकून ठेवून द्यावे. 

२. आता या आप्प्यांमध्ये घालायचे सारण तयार करून घ्यावे. स्टफिंग तयार करण्यासाठी सर्वात आधी एका मोठ्या बाऊलमध्ये मक्याचे दाणे, किसून घेतलेले पनीर, काळीमिरी पूड, ऑरेगॅनो, चिलीफ्लेक्स, वेगवेगळ्या रंगांच्या बारीक चिरलेल्या ढोबळी मिरच्या, किसलेलं चीज असे सगळे जिन्नस एकत्रित करून स्टफिंग तयार करून घ्यावे. 

मटार सोलण्याचं काम होईल झटपट, ३ ट्रिक्स- काही मिनिटांतच मटार होतील सोलून...

३. आता हिरव्या मटारच्या तयार बॅटरचे झाकण उघडून त्यात थोडेसे तेल, आवश्यक असेल तर गरजेनुसार पाणी आणि सर्वात शेवटी इनो व त्यावर चमचाभर पाणी घालून मिश्रण चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावे. 

४. आता आप्पे पात्र गॅसच्या मंद आचेवर ठेवून हलकेच गरम करून घ्यावे. त्यानंतर आप्पे पात्रात तेल सोडून मग त्यावर हिरव्या मटारचे तयार बॅटर घालावे. हे बॅटर अर्धवट घातल्यावर त्यानंतर त्यावर स्टफिंग चमच्याने घालावे. मग पुन्हा या स्टफिंगवर हिरव्या मटारचे बॅटर घालावे. मग वर झाकण ठेवून ५ ते १० मिनिटे ते व्यवस्थित शिजवून घ्यावे. एका बाजूने शिजवून झाल्यावर चमच्याच्या मदतीने हे आप्पे दुसऱ्या बाजूने हलवून घेऊन दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यावे. 

हिरव्यागार मटारचे स्टफिंग आप्पे खाण्यासाठी तयार आहेत. हिरवीगार चटणी किंवा सॉससोबत हे आप्पे खाण्यासाठी सर्व्ह करावेत.

Web Title: Instant Green Peas Appe Matar Appe Recipe How To Make Matar Appe At Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.