Lokmat Sakhi >Food > नाश्त्याला झटपट बनवा इंन्स्टंट आप्पे, लहान मुलं होतील खूश-नाश्ताही होईल हेल्दी...

नाश्त्याला झटपट बनवा इंन्स्टंट आप्पे, लहान मुलं होतील खूश-नाश्ताही होईल हेल्दी...

Instant Healthy Breakfast Recipe Appe : लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा पौष्टीक-चविष्ट नाश्ता..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2023 08:20 AM2023-08-02T08:20:17+5:302023-08-02T08:25:02+5:30

Instant Healthy Breakfast Recipe Appe : लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा पौष्टीक-चविष्ट नाश्ता..

Instant Healthy Breakfast Recipe Appe :Make breakfast quickly with Instant Appe, kids will be happy - breakfast will be healthy too... | नाश्त्याला झटपट बनवा इंन्स्टंट आप्पे, लहान मुलं होतील खूश-नाश्ताही होईल हेल्दी...

नाश्त्याला झटपट बनवा इंन्स्टंट आप्पे, लहान मुलं होतील खूश-नाश्ताही होईल हेल्दी...

नाश्त्याला रोज पोहे, उपमा खाऊन कंटाळा येतो. शिळं काही उरलं असेल तर फोडणीची पोळी नाहीतर फोडणीचा भात असतोच. मात्र सतत हे खाऊन कंटाळा आला असेल आणि वेगळं काहीतरी खायची इच्छा होत असेल तर झटपट होईल असं काय करता येईल असा प्रश्न आपल्याला पडतो. सकाळच्या वेळात नाश्ता, डबे, साफसफाई आणि आवरुन ऑफीसला जाण्याची घाई असल्याने आपल्याकडे फार कमी वेळ असतो. या वेळात पोटभरीचा आणि तरीही पौष्टीक नाश्ता करायचा तर सारखं काय करायचं हा प्रश्न असतोच. घरात सहज उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून झटपट होणारा एक आगळावेगळा पदार्थ आज आपण पाहणार आहोत. हा पदार्थ गरम खाल्ला तरी छान लागतो आणि मुलांना ब्रेकफास्टचा डबा द्यायचा असेल तरी त्यात देऊ शकतो. पाहूयात हा पदार्थ कोणता आणि तो कसा करायचा (Instant Healthy Breakfast Recipe Appe). 

साहित्य -

१. रवा - एक वाटी

२. कांदा - एक बारीक चिरलेला

३. हिरवी मिरची - आवश्यकतेनुसार

४. गाजर - अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेलं

५. कोथिंबीर - चिरलेली अर्धी वाटी 

६. मीठ - चवीनुसार

(Image : Google)
(Image : Google)

७. दही - पाव वाटी

८. खाण्याचा सोडा - पाव चमचा

९. तेल - २ चमचे

१०. मोहरी - अर्धा चमचा

११. जिरं - पाव चमचा

१२. कढीपत्ता - ८ ते १० पाने

१३. हळद - पाव चमचा

कृती -

१. एका बाऊलमध्ये रवा घेऊन त्यात बारीक चिरलेला कांदा आणि गाजर, कोथिंबीर घालावी.

२. यामध्ये दही आणि मीठ घालून थोडे पाणी घालून हे सगळे चांगले एकजीव हलवून घ्यावे. 

३. एका लहानशा कढईमध्ये तेल घालून त्यात मोहरी, जीरं, हळद आणि कडीपत्ता घालून फोडणी करावी. 

४. ही गरम फोडणी या मिश्रणात घालून पुन्हा सगळे एकजीव करावे. 

५. यावर थोडासा सोडा घालून आवश्यकतेनुसार पाणी घालून मिश्रण चांगले एकजीव करावे. 

६. आप्पे पात्रात तेल घालून त्यामध्ये हे पीठ घालावे आणि आप्पे दोन्ही बाजुने खरपूस भाजून घ्यावेत. 

७. आवडीनुसार घरात उपलब्ध असलेल्या कोणत्याही भाज्या आपण यामध्ये घालू शकतो. 

८. हे आप्पे नुसते किंवा चटणी, सॉस कशासोबतही छान लागतात. 

 

Web Title: Instant Healthy Breakfast Recipe Appe :Make breakfast quickly with Instant Appe, kids will be happy - breakfast will be healthy too...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.