Join us  

वाटीभर हिरव्या मुगाचा करा खमंग नाश्ता; सोपी रेसिपी, ५ मिनिटात तयार होईल सुपरटेस्टी पदार्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 4:49 PM

Instant Healthy Rava Appe : सोप्या पद्धतीनं रोजच्या रेसिपीत थोडा बदल करून नाश्ता बनवला घरातील सगळेच पोटभर  खातील.

पोहे, उपमा असे तेचतेच पदार्थ खाऊन कंटाळा आला की नाश्त्याला काहीतरी नवीन खाण्याची इच्छा होते. (Instant Healthy Rava Appe) अशावेळी बाहेरचे तेलकट, मैद्याचे पदार्थ खाण्यापेक्षा घरी नाश्ता बनवलेला कधीही उत्तम ठरतो. खासकरून घरातील लहान मुलं जेव्हा बाहेरचं खाण्याचा हट्ट धरतात तेव्हा त्यांना बाहेरचे पदार्थ देण्यापेक्षा घरीच उत्तम चवीचा पौष्टीक नाश्ता बनवल्यास आरोग्याची काळजी घेता येईल आमि मुलांची तब्येतही चांगली राहील. (How to Make Appe) कडधान्य, पालेभाज्या खायला मुलं नेहमीचं नाक मुरडतात. अशावेळी सोप्या पद्धतीनं रोजच्या रेसिपीत थोडा बदल करून नाश्ता बनवला ते पोटभर  खातील. (Breakfast Recipes)

१) सगळ्यात आधी मोड आलेले मूग आणि चणे, मिरच्या, आलं, लसूण, कढीपत्ता, जीरं, मीठ आणि पाणी घालून मिश्रण दळून घ्या.  

२) त्यात एक वाटी रवा, एक वाटी बेसन पीठ आणि, १ बारीक चिरलेला कांदा, गाजराचे काप, बारीक चिरलेल्या मिरच्या, मीठ घाला. हे मिश्रण एकजीव करून घ्या त्यानंतर यात बेकींग सोडा घाला. हे मिश्रण एकजीव करून बाजूला ठेवून द्या.

३) अप्प्याचं भाडं व्यवस्थित गरम करून ठेवा. त्यात तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहोरी घाला. मोहोरी तडतडल्यानंतर त्यात चमच्याच्या साहाय्याने हे मिश्रण घाला. 

४) १५ ते २० मिनिटं वाफेवर शिजवल्यानंतर अप्पे पलटून घ्या. ५ मिनिटांनी गॅस बंद करा. तयार आहे गरमागरम मुगाचे अप्पे. 

नाश्त्याला अप्पे का खावेत?

अप्पे हा पारंपारीक दक्षिण भारतीय पदार्थ आहे.  उदीड डाळ आणि तांदळाचे अप्पे तयार केले जातात. तर काहीजण आपल्या आवडीनुसार मूग डाळ, चणा डाळ, मसूर डाळ किंवा कडधान्य, बेसनाचं पीठ वापरून अप्पे बनवतात. आहारतज्ज्ञांच्यामते ४ ते ५ अप्प्यांमध्ये  ४३ कॅलरीज असतात.

पावसाळ्यात कांदा-लसूण खाऊ नये हे कितपत खरे? पचनाशी काय संबंध? आहारातज्ज्ञ सांगतात..

वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेल्यंना हा हेल्दी पर्याय आहे. यात कार्बोहायड्रेट्स फॅ्टस प्रोटीन्स, फॅट्स आणि अमिनो एसिड्स, फायबर्सचे प्रमाण जास्त असते. याव्यतिरिक्त यात सोडीयमही असते.  ज्यामुळे हाडं आणि किडन्या निरोगी राहण्यास मदत होते. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वासाठी हा उत्तम पर्याय आहे. टिफिनसाठी किंवा मधल्यावेळेत भूक लागल्यानंतर खाण्यासाठी तुम्ही ही डिश बनवू शकता.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स