भारतीय लोकांना नाश्त्याला साऊथ इंडियन डिश खायला आवडतात. इडली, डोसा, मेदू वडा, उत्तप्पा, अप्पे, हे पदार्थ महाराष्ट्रात देखील फेमस आहेत. ज्यात क्रिस्पी डोसा खाणारा खवय्यावर्ग फार मोठा आहे. डोश्यामध्ये अनेक प्रकार केले जातात. आपल्याला हाय - इन प्रोटीन डोसा खायचा असेल तर, त्यात ५ डाळींचा समावेश करा.
साधारण डोसा करण्यासाठी तांदूळ, उडीद डाळीचा वापर केला जातो. पीठ वाटून त्याला आंबवण्यासाठी ठेवले जाते. अशा प्रकारे डोश्याचे पीठ तयार होते. पण हाय - इन प्रोटीन डोसा करण्यासाठी आपण यात ५ प्रकारच्या डाळीचा वापर करू शकता. मुख्य म्हणजे हा डोसा करण्यासाठी पीठ आंबवण्याची गरज नाही. कमी वेळात - झटपट डोसे तयार होतील(Instant high protein dosa, gluten free, weight loss recipe).
५ डाळींचा डोसा करण्यासाठी लागणारं साहित्य
तांदूळ
चणा डाळ
मुग डाळ
तूर डाळ
उडीद डाळ
मसूर डाळ
कडीपत्ता
तेलाचा थेंबही न वापरता करा शिळ्या चपातीचे चटपटीत चाट, १० मिनिटांत मस्त खाऊ
काश्मिरी लाल मिरच्या
आलं
हिंग
सैंधव मीठ
इडली पोडी चटणी
कृती
सर्वप्रथम, एका भांड्यात एक कप तांदूळ घ्या, त्यात एक कप पाणी घालून तांदूळ धुवून घ्या. त्यानंतर त्यात एक कप पाणी घालून तांदूळ भिजत ठेवा. दुसऱ्या भांड्यात एक कप चणा डाळ, एक वाटी मूग डाळ, एक वाटी तूर डाळ, एक वाटी उडीद डाळ आणि एक वाटी मसूर डाळ घेऊन मिक्स करा, डाळींमध्ये पाणी घालून धुवून घ्या. त्यानंतर त्यात २ कप पाणी घालून त्यावर झाकण ठेऊन डाळी भिजत ठेवा. आपण डाळ आणि तांदूळ रात्रभर भिजत ठेऊ शकता. किंवा ४ ते ५ तासांसाठी देखील भिजत ठेऊ शकता.
डाळ आणि तांदूळ भिजल्यानंतर मिक्सरचं भांडं घ्या. त्यात भिजलेले तांदूळ घालून पेस्ट तयार करा. तांदुळाची पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात भिजलेली डाळ, मुठभर कडीपत्ता, ४ ते ५ काश्मिरी लाल मिरच्या आल्याचा तुकडा आणि गरजेनुसार पाणी घालून पेस्ट तयार करा. व ही पेस्ट तांदुळाच्या पिठात मिक्स करा. त्यानंतर त्यात चिमुटभर हिंग आणि सैंधव मीठ घालून चमच्याने बॅटर मिक्स करा.
विकत कशाला आणायची आता घरीच करा झणझणीत शेजवान चटणी, करायला सोपी - टिकेल भरपूर
दुसरीकडे नॉन स्टिक पॅन गरम करण्यासाठी ठेवा. त्यावर ब्रशने तेल लावून पॅन ग्रीस करा, नंतर चमच्याने बॅटर पसरवा. मध्यम आचेवर दोन्ही बाजूने खरपूस डोसा भाजून घ्या. डोश्याची चव वाढवण्यासाठी आपण त्यावर इडली पोडी चटणी पसरवू शकता. अशा प्रकारे न आंबवता पौष्टीक हाय - इन प्रोटीन डोसा खाण्यासाठी रेडी. आपण हा डोसा चटणी आणि सांबारसोबत खाऊ शकता.