Join us  

हॉटेलसारखा कुरकुरीत डोसा १० मिनिटांत घरीच करा; १ सोपी ट्रिक, खा गरमागरगम डोसा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2023 3:14 PM

Instant High Protein Dosa Recipe : नेहमीच डोसा खाण्याऐवजी हाय प्रोटीन डोसा खाल्ल्यानं पोषणही मिळेल तोंडाची चवही वाढेल. (Cooking Hacks &Tips)

नाश्त्याला नेहमी तेच तेच खाऊन कंटाळा आला की काहीतरी नवीन खाण्याची इच्छा होते. नेहमी नेहमी बाहेरचं खाल्ल्यानंतर पोट बिघडतं-गंभीर आजारही होऊ शकतात. (How to make high protein Dosa Simple Recipe)अशावेळी घरीच पौष्टीक पदार्थ बनवल्यास तुमचं काम सोपं होऊ शकतं. नेहमीच डोसा खाण्याऐवजी हाय प्रोटीन डोसा खाल्ल्यानं पोषणही मिळेल तोंडाची चवही वाढेल. (Cooking Hacks &Tips)

डाळ तांदूळाचा चविष्ट डोसा तुम्ही अनेकदा खाल्ला असेल त्यात तर तुम्ही अजून डाळी, धान्याचा समावेश केला तर शरीराला भरभरून पोषण मिळेल. (How to make High Protein Dosa) डाळीत अनेक पोषक तत्व असतात. ज्यामुळे हाडं चांगली राहतात आणि स्नायूंच्या विकासासही मदत होते. एकापेक्षा जास्त डाळी घालून डोसा बनवण्याची सोपी पद्धत पाहूया.

प्रोटीन डोसा बनवण्याची योग्य पद्धत

1) क्विनोआ, काळी उडीदाची डाळ, हिरवी मुगाची, मसूर डाळ, मेथीच्या बीया एकत्र करा आणि  २ ते ३ वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्या. हे धुतलेले मिश्रण दळून घ्या. नंतर एका भांड्यात काढून ते आंबवण्यासाठी रात्रभर ठेवा. 

2) सकाळी आंबवण्यासाठी ठेवलेलं पीठ काढून चमच्याने व्यवस्थित एकजीव करा.  त्यात पाणी, मीठ घालून एकत्र करा. गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवा तवा गरम झाल्यानंतर त्यावर गोलाकार डोशाचे पीठ पसरवून डोसा काढून घ्या. हा डोसा तुम्ही नारळाची चटणी किंवा सॉस, सांबारबरोबर खाऊ शकता. 

डोश्याबरोबर खाण्यासाठी नारळाची चटणी कशी बनवायची?

1) सगळ्यात आधी एक नारळं फोडून त्याचे बारीक  तुकडे करा. हे तुकडे मिक्सरच्या भांड्यात घाला आणि जाडसर वाटून घ्या. 

2) खोबऱ्याचं मिश्रण एका ताटात काढून मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची, भाजलेली डाळ आणि आलं घालून पुन्हा बारीक दळून घ्या.

3) या मिश्रणासह वाटलेलं नारळ,  लिंबाचा रस, मीठ आणि १/२ कप पाणी घालून पुन्हा दळून घ्या. आता एका पॅनमध्ये तेल गरम करून फोडणी घाला. 

4) फोडणीत मोहोरी, जीर, कढीपत्ता, सुकी लाल मिरची घाला. ही फोडणी दळलेल्या मिश्रणावर घाला तयार आहे चवदार ओल्या नारळाची चटणी

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स