Join us  

ना डाळ- तांदूळ, ना इनो अगदी इडली पात्रही नको! करा १० मिनिटात इडली पात्राशिवाय इडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2024 10:00 AM

Instant Idli Recipe with Rava and Curd 10 Mins : इडली मेकरशिवाय इडली? कसं शक्य आहे? ही ट्रिक एकदा पाहाच..

नाश्त्याला बरेच जण इडली खातात. डाळ- तांदुळाची इडली प्रत्येकाला आवडते (Idli Making). वाफवलेली इडली बनवायला सोपी आणि खायला देखील पौष्टीक असते. इडली सांबार, इडली चटणी, किंवा चिल्ली इडली असे पदार्थ आपण खातो (South Indian Recipe). पण दाक्षिणात्य पद्धतीची इडली करायला घेतली तर, बराच वेळ जातो. उडीद डाळ आणि तांदूळ भिजत घालण्यापासून ते बॅटर तयार करणं आणि पीठ आंबवणं ही प्रक्रिया खूप वेळखाऊ वाटते (Cooking Tips).

शिवाय रोज अण्णाच्या ठेल्यावरची इडली खायला देखील नको वाटतं. जर आपल्याला झटपट इडली करायची असेल. शिवाय घरात इडली मेकर उपलब्ध नसेल तर, चाळणीच्या मदतीनेही आपण इडली तयार करू शकता. झटपट इडली कशी तयार करायची पाहूयात(Instant Idli Recipe with Rava and Curd 10 Mins).

इडली मेकरशिवाय इडली करण्याची सोपी कृती

लागणारं साहित्य

रवा

दही

हिरवी मिरची

फक्त १५ मिनिटांत प्रेशर कूकरमध्ये लावा दही! पाहा दही लावण्याची युनिक ट्रिक, मिळेल परफेक्ट दही

तेल

हिंग

उडीद डाळ

मोहरी

मीठ

कृती

सर्वप्रथम,  एका बाऊलमध्ये एक कप रवा घ्या. त्यात अर्धा कप दही घालून चमच्याने मिक्स करा. नंतर त्यात अर्धा कप पाणी घाला. साहित्य मिक्स केल्यानंतर त्यावर झाकण ठेवा. जेणेकरून रवा छान फुलेल.

३० मिनिटानंतर पुन्हा त्यात ३ चमचे पाणी घाला. नंतर त्यात एक चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि मीठ घालून मिक्स करा. आपण त्यात आपल्या आवडीनुसार बारीक चिरलेल्या भाज्या घालून  मिक्स करू शकता.

आता फोडणीची पळी गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. त्यात एक चमचा तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात चिमुटभर हिंग घाला. नंतर त्यात एक चमचा उडीद डाळ, अर्धा चमचा मोहरी घालून मिक्स करा. मोहरी तडतडल्यानंतर गॅस बंद करा. तयार फोडणी रव्याच्या बॅटरमध्ये घाला आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून मिक्स करा.

१ कप सोया चंक्सचे करा इन्स्टंट आप्पे, १० मिनिटांत खा चमचमीत सोयाबिन आप्पे, वजनही होईल कमी

जर आपल्याकडे इडली मेकर नसेल तर, आपण चाळणीवर देखील इडली तयार करू शकता. किंवा आपण वाटीमध्ये बॅटर घालून इडली तयार करू शकता. यासाठी कढईमध्ये पाणी घालून गरम करण्यासाठी ठेवा. बारीक छिद्रांची चाळण घ्या. त्यावर चमचाभर बॅटर ओता. चाळण कढईच्या मध्यभागी ठेवा आणि त्यावर झाकण ठेवा.

१० मिनिटानंतर इडली वाफेवर शिजली की नाही, हे तपासा. १५ मिनिटानंतर चाळणीवरून तयार इडली सुरीने काढा. अशा प्रकारे इडली मेकरशिवाय फ्लफी इडली खाण्यासाठी रेडी. आपण ही इडली चटणीसोबत देखील खाऊ शकता. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स