सण असो किंवा कार्यक्रम, जेवणाच्या ताटात गोड पदार्थ हवाच. गोड पदार्थात अनेकांना जिलेबी आवडते. सध्या मिठाईच्या दुकानात विविध प्रकारची जिलेबी मिळतात. गोल - गोल आकारात तयार होणारी रसरशीत जिलेबी क्रिस्पी लागते. पाकातील गोडव्यामुळे या पदार्थाची चव आणखी वाढते.
गरमा - गरम जिलेबी खाण्याची मज्जाच काही वेगळी आहे. पण घरी जिलेबी बनवायला गेलं तर, ही रेसिपी हलवाईस्टाईल बनत नाही. घरी जिलेबी बनवत असताना, ती क्रिस्पी होत नाही. तिचा आकार बिघडतो किंवा चवीमध्ये काहीतरी गडबड होते. आपल्याला जर हलवाईस्टाईल घरच्या घरी जिलेबी बनवायची असेल तर, ही रेसिपी ट्राय करा. कमी साहित्यात - कमी वेळात बनते झटपट(Instant jalebi recipe | homemade crispy jalebi recipe).
इस्टंट रसरशीत क्रिस्पी जिलेबी बनवण्यासाठी लागणारं साहित्य
साखर
पाणी
पिवळा खायचा रंग
दह्यात मीठ घालून खावे की साखर? तज्ज्ञ सांगतात काय फायद्याचं - कशाने बिघडते तब्येत
मैदा
मीठ
फ्रुट सॉल्ट
तेल
या पद्धतीने बनवा रसरशीत क्रिस्पी जिलेबी
सर्वप्रथम, पाक तयार करा. यासाठी गॅसवर पॅन ठेवा, त्यात २ कप साखर व दीड कप पाणी घालून मिक्स करा. पाक जास्त शिजवायचं नाही, गुलाबजामसाठी ज्या प्रकारे पाक आपण तयार करतो, त्याच प्रमाणे पाक तयार करा. साखर विरघळल्यानंतर मिडीयम फ्लेमवर पाकातील पाणी आटवून घ्या. पाक रेडी झाल्यानंतर गॅस बंद करा, व त्यात खायचा पिवळा रंग मिक्स करा. अशा प्रकारे पाक रेडी आहे.
जिलेबी बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये एक कप मैदा घ्या. त्यात पाव चमचा मीठ, अर्धा कप पाणी घालून मिश्रण मिक्स करा. मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्यात एक चमचा फ्रुट सॉल्ट घालून मिक्स करा. अशा प्रकारे पीठ रेडी झाले आहे. आता एक ग्लास घ्या, त्यात पायपिंग बॅग ठेवा, पायपिंग बॅगची खालून टोक कापा, व त्यात मैद्याचे तयार मिश्रण भरा.
पांढरेशुभ्र बटाटा वेफर्स करण्याची सोपी झ्टपट पद्धत, वर्षभर टिकतील वेफर्स
दुसरीकडे एका कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा, तेल गरम झाल्यानंतर त्यात जिलेबी सोडा, व मंद आचेवर जिलेबी सोनेरी रंग येऊपर्यंत तळून घ्या. जिलेबी तयार झाल्यानंतर गरम पाकात सोडा, ज्यामुळे जिलेबी पाक शोषून घेईल. थोड्या वेळानंतर जिलेबी एका प्लेटमध्ये काढून घ्या. अशा प्रकारे रसरशीत क्रिस्पी जिलेबी खाण्यासाठी रेडी.