Join us  

Instant Kairi Pickle Recipe: ताज्याताज्या कैरीचं चटपटीत आंबट- गोड लोणचं! उन्हाळ्यात जेवणाची वाढेल रंगत, 5 मिनिटांत लोणचं तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2022 7:09 PM

Kairi pickle recipe: कैरीचं पक्क किंवा वर्षभरासाठीचं लोणचं आपण साधारण जुनमध्ये घालतो.. पण तोपर्यंत हे चटपटीत आंबट- गोड लाेणचं खाऊन पहा... बघा ही रेसिपी, ५ मिनिटांत लोणचं तयार.

ठळक मुद्देकैरीचं हे आंबटगोड आणि झटपट होणारं लोणचं उन्हाळ्यात जेवणाची रंगत वाढवतं हे नक्की.

उन्हाळा आला की आपसूकच काहीतरी आंबटगोड खावंसं वाटतं.. पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात जेवढं आंबट आपण खात नाही, तेवढं आंबट उन्हाळ्यात अगदी सहज खाल्लं जातं.. त्यामुळेच तर उन्हाळी सरबतं आणि उन्हाळी पदार्थही खास आंबट- गोड चवीची असतात. उन्हाळ्यात करायचा आणखी एक खास पदार्थ म्हणजे कैरीचं तात्पुरतं चटपटीत लोणचं.. हे लोणचं करण्याची रेसिपी (Instant kairi pickle within 5 minutes) अतिशय सोपी असून अगदी ५ मिनिटांत हे आंबटगोड लोणचं तयार होते..

 

कैरीचं तात्पूरतं लोणचं तयार करण्यासाठी लागणारं साहित्यएखादी कैरी, बाजारात मिळणारा कोणताही लोणचे मसाला, गुळ, तेल, तिखट, मीठकसं तयार करायचं लोणचं?how to make kairi pickle?- लोणचं तयार करण्यासाठी कैरीच्या बारीक फोडी करून घ्या. कैरीची कोवळी काेय या लोणच्यासाठी वापरू नये.- काही रेसिपींमध्ये कैरी चिरून घेण्याऐवजी किसून घेतली जाते. - कैरीच्या फोडी एखादी वाटी भरून असतील तर त्यात एक टेबलस्पून लोणचे मसाला टाका.- एक टेबलस्पून गुळाची पावडर किंवा मग अर्धा टीस्पून पिठीसाखर टाका.

- चवीनुसार मीठ टाका. सगळ्यात शेवटी अर्धा टेबलस्पून गरम तेल टाका आणि हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या.- साधारण एक तासानंतर या लोणच्याला छान पाणी सुटतं..- फ्रिजमध्ये ठेवल्यास २ ते ३ दिवस हे लोणचं छान टिकतं..- पक्क लोणचं आपण साधारण जून महिन्यात घालतो. पण तोपर्यंत तोंडी लावायला केलेलं कैरीचं हे आंबटगोड आणि झटपट होणारं लोणचं उन्हाळ्यात जेवणाची रंगत वाढवतं हे नक्की.

 

टॅग्स :अन्नपाककृतीसमर स्पेशलकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.