महाराष्ट्रात गुजराथी नाश्त्याचे प्रकार खूप प्रसिद्ध आहे. गुजराथी पदार्थ म्हटल्यावर आधी ढोकळा हा पदार्थ आठवतो. ढोकळा करण्याच्या अनेक पद्धती आहेत. काही लोकं बेसनाचा ढोकळा तयार करतात, तर काही रव्याचा ढोकळा तयार करतात. सॉफ्ट आणि टेस्टी ढोकळा अनेकांना नाश्त्यामध्ये खायला आवडतो.
मात्र, घरी तयार करायला घेतल्यास ढोकळा कडक किंवा स्पंजी तयार होत नाही. जर आपल्याला नाश्त्यामध्ये काहीतरी हटके खायचं असेल तर, कटोरी ढोकळा करून पाहा. बहुतांश लोकं ढोकळा एका भांड्यात तयार करतात. ढोकळा तयार झाल्यानंतर त्याचे चौकोनी काप करतात. जर आपल्याला ढोकळ्यामध्ये हटके प्रयोग करून पाहायचं असेल तर, कटोरी ढोकळा ही रेसिपी नक्की करून पाहा(Instant Katori Khaman Dhokla Recipe - Easy Homemade Tea time Snack).
कटोरी ढोकळा करण्यासाठी लागणारं साहित्य
बेसन
पाणी
मीठ
साखर
आलं - मिरचीची पेस्ट
वाफवण्याचं टेन्शन सोडा, कमी वेळात करा खमंग कोथिंबीर वडी! १५ मिनिटांत झटपट वडी
हळद
सायट्रिक ऍसिड
इनो
तेल
जिरं
मोहरी
हिरवी मिरची
लिंबू
कृती
सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये एक कप बेसन घ्या. त्यात अर्धा चमचा साखर, अर्धा चमचा मीठ घालून मिक्स करा. नंतर त्यात गरजेनुसार पाणी घाला, व सरसरीत बॅटर तयार करा. बॅटर तयार करताना त्यात गुठळ्या तयार होणार नाही याची काळजी घ्या.
बॅटर तयार झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा आलं - मिरचीची पेस्ट, चिमुटभर हळद, सायट्रिक ऍसिड आणि एक मोठा चमचा तेल घालून साहित्य एकजीव करा. ५ मिनिटं सतत एकाबाजूने मिश्रण ढवळत राहा. जेणेकरून बॅटर स्मूद तयार होईल. बॅटर रेडी झाल्यानंतर त्यावर १० मिनिटांसाठी झाकण ठेऊन द्या.
छोट्या स्टीलच्या वाट्यांना तेल लावून ग्रीस करा. जेणेकरून बॅटर वाट्यांना चिटकणार नाही. नंतर त्यात एक चमचा इनो घाला. इनो घातल्यानंतर त्यात २ चमचे पाणी घाला, व चमच्याने एका बाजूने मिक्स करा. तयार बॅटर स्टीलच्या वाट्यांमध्ये ओतून घ्या. दुसरीकडे स्टीमरमध्ये पाणी घालून गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर स्टँडवर वाट्या ठेवा, व त्यावर झाकण ठेऊन १५ मिनिटांसाठी मध्यम आचेवर ढोकळा वाफवून घ्या.
भाकरी कडक किंवा वातड होतात, १ चमचाभर १ पदार्थ घालून करा भाकरी, शिळी भाकरीही राहील मऊ
१५ मिनिटानंतर ढोकळा शिजला आहे की नाही हे चेक करा. तयार झाल्यानंतर वाट्या बाहेर काढून ठेवा. थंड झाल्यानंतर ढोकळा वाटीमधून हळुवारपणे काढा. फोडणीच्या पळीत एक चमचा तेल घाला, त्यात एक चमचा मोहरी, चिमुटभर हिंग, बारीक उभी चिरलेली हिरवी मिरची, ५ ते ६ कडीपत्याची पानं, अर्धा कप पाणी, चवीनुसार मीठ, लिंबाचा रस आणि एक चमचा साखर घालून मिक्स करा. पाण्याला उकळी आल्यानंतर तयार फोडणी ढोकळ्यावर पसरवा. अशा प्रकारे ढोकळा खाण्यासाठी रेडी.