Lokmat Sakhi >Food > ना इनो, ना दही - चहाच्या पातेल्यात करा झटपट हलकाफुलका ढोकळा, १० मिनिटांत करा मस्त ढोकळा

ना इनो, ना दही - चहाच्या पातेल्यात करा झटपट हलकाफुलका ढोकळा, १० मिनिटांत करा मस्त ढोकळा

Instant Khaman Dhokla Recipe Without Eno : कोण म्हणतं विकतसारखा ढोकळा घरी करता येत नाही, मिक्सरच्या भांड्यात फिरवा बॅटर, १० मिनिटात रेडी होईल ढोकळा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2024 12:34 PM2024-01-02T12:34:02+5:302024-01-02T12:34:43+5:30

Instant Khaman Dhokla Recipe Without Eno : कोण म्हणतं विकतसारखा ढोकळा घरी करता येत नाही, मिक्सरच्या भांड्यात फिरवा बॅटर, १० मिनिटात रेडी होईल ढोकळा..

Instant Khaman Dhokla Recipe Without Eno | ना इनो, ना दही - चहाच्या पातेल्यात करा झटपट हलकाफुलका ढोकळा, १० मिनिटांत करा मस्त ढोकळा

ना इनो, ना दही - चहाच्या पातेल्यात करा झटपट हलकाफुलका ढोकळा, १० मिनिटांत करा मस्त ढोकळा

नाश्ता किंवा स्नॅक्समध्ये खाण्यासाठी महिला वेगवेगळ्या पदार्थांच्या शोधात असतात. लहान मुलं किंवा वयस्कर नेहमी हटके पदार्थाची मागणी करतात. अशा वेळी गृहिणींना काय करावे सुचत नाही. नाश्त्यामध्ये बरेच जण दाक्षिणात्य पदार्थ किंवा पोहे, उपमा खातात. लहान मुलं डब्याला देखील हेच पदार्थ नेतात. पण जर त्यांनी कधी हटके पदार्थाची मागणी केली तर, त्यांना खमण ढोकळा (Khaman Dhokla) तयार करून द्या.

अनेकांना खमण ढोकळा बनवणे कठीण वाटते. पण विकतसारखा ढोकळा घरी तयार करायचा असेल तर, ही रेसिपी नक्कीच फॉलो करून पाहा. शिवाय ही रेसिपी चहाच्या पातेल्यात आपण करून पाहू शकता. बहुतांश लोकं ढोकळा पात्र घरी नसल्यामुळे ढोकळा करत नाही (Cooking Tips). पण ढोकळा घरातील चहाच्या पातेल्यात देखील तयार होऊ शकते. दही, इनो किंवा डाळीचा वापर न करता खमण ढोकळा कसा तयार करायचा पाहा(Instant Khaman Dhokla Recipe Without Eno).

खमण ढोकळा करण्यासाठी लागणारं साहित्य

तेल

साखर

हळद

सायट्रिक अॅसिड

मीठ

आलं

हिरवी मिरची

सुरणाचे वडे कधी खाल्ले आहेत? हिवाळ्यात खायलाच हवे असे पौष्टिक वडे, रेसिपी अगदी सोपी

बेसन

मोहरी

कढीपत्ता

हिंग

तीळ

कृती

सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात २ मोठे टेबलस्पून तेल घाला. त्यात २ मोठे टेबलस्पून साखर, चिमुटभर हळद, एक चमचा सायट्रिक अॅसिड, २ चमचे पाणी, २ हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं घालून ब्लेण्ड करून घ्या. नंतर त्यात कपभर बेसन, एक कप पाणी आणि चवीनुसार मीठ घालून गुळगुळीत बॅटर तयार करून घ्या. तयार बॅटरवर १० मिनिटांसाठी झाकण ठेवा.

चहाच्या भांड्यात एक बटर पेपर घालून ठेवा, व ब्रशने आतल्या बाजूने तेल लावा. जेणेकरून ढोकळा चिकटणार नाही. दुसरीकडे कुकरच्या भांड्यात स्टॅण्ड आणि पाणी घालून ठेवा. गॅस मध्यम आचेवर ठेवा. १० मिनिटं झाल्यानंतर बॅटरमध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा घाला, नंतर त्यात २ चमचे पाणी घाला. तयार बॅटर चहाच्या भांड्यात ओतून घ्या. चहाचं भांडं स्टॅण्डवर ठेवा. तयार कुकरचं झाकण लावा, पण कुकरचं झाकण लावताना त्याची शिट्टी काढा. मध्यम आचेवर ढोकळा १० मिनिटांसाठी वाफेवर शिजवून घ्या.

वाटीभर उडीद - मूग डाळीची करा पौष्टीक-लुसलुशीत इडली, प्रोटीनयुक्त डाळींचा बेस्ट नाश्ता

१० मिनिटानंतर ढोकळा शिजला आहे की नाही हे चेक करा. ढोकळा तयार झाल्यानंतर भांडं कुकरमधून काढून बाहेर ठेवा. नंतर एका कढईत एक चमचा तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा मोहरी, हिरवी मिरची, हिंग, कढीपत्ता, एक चमचा तीळ घालून परतवून घ्या. त्यात अर्धा कप पाणी आणि साखर घाला. उकळी आल्यानंतर गॅस बंद करा. तयार ढोकळा सुरीने कापून घ्या. तयार ढोकळ्यावर फोडणी ओता, व त्यावर कोथिंबीर भुरभुरून डिश सर्व्ह करा. तयार ढोकळा आपण हिरवी चटणीसोबत खाऊ शकता.  

Web Title: Instant Khaman Dhokla Recipe Without Eno

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.