Lokmat Sakhi >Food > लिंबाचं चटपटीत लोणचं फक्त १० मिनिटात बनवा तेही बिना तेलाचं; ही घ्या सोपी, खास रेसेपी

लिंबाचं चटपटीत लोणचं फक्त १० मिनिटात बनवा तेही बिना तेलाचं; ही घ्या सोपी, खास रेसेपी

Instant Lemon Pickle : हे लोणचं काही मिनिटात बनवता येतं आणि जास्तवेळ टिकतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 11:22 AM2022-07-11T11:22:00+5:302022-07-11T13:40:46+5:30

Instant Lemon Pickle : हे लोणचं काही मिनिटात बनवता येतं आणि जास्तवेळ टिकतं.

Instant Lemon Pickle : Easy pickle recipe without oil make spicy lemon pickle without oil in just 10 minutes  | लिंबाचं चटपटीत लोणचं फक्त १० मिनिटात बनवा तेही बिना तेलाचं; ही घ्या सोपी, खास रेसेपी

लिंबाचं चटपटीत लोणचं फक्त १० मिनिटात बनवा तेही बिना तेलाचं; ही घ्या सोपी, खास रेसेपी

(Image Credit- Dilocious.com TOI)

लिंबाचं नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटतं. भारतात, बहुतेक लोकांना साइड डिश म्हणून लोणचे खायला आवडते. पराठ्यांसोबत, डाळ भातासोबत लोक आंबा, लिंबू किंवा मिरचीचे लोणचे अगदी आवडीने खातात. बरेच लोक बाहेरून लोणचं आणतात. कारण घरी लोणचं बनवण्याची योग्य पद्धत माहित नसते. (How do you make sweet lemon pickles without oil) याशिवाय घरी लोणचं बनवलं तरी ते लवकर खराब होतं. (Zero Oil No Cooking Instant Lemon Pickle Recipe Super Easy recipe)

पण तुम्ही फक्त 10 ते 15 मिनिटांत लिंबाचे आंबट गोड लोणचे बनवू शकता, तेही तेलाशिवाय. लिंबाचे लोणचे जेवढे स्वादिष्ट आहे तेवढेच ते आरोग्यदायी आहे. मास्टर शेफ पंकज भदौरिया (MasterChef  Pankaj Bhadouria)यांनी आंबट गोड लिंबाच्या लोणच्याची रेसिपी शेअर केली आहे. हे लोणचं काही मिनिटात बनवता येतं आणि जास्तवेळ टिकतं. (10 minute lemon pickle recipe without oil)

लिंबाच्या लोणच्यासाठी लागणारं साहित्य (Super Easy Zero Oil Sweet and Sour Lemon Pickle)

लिंबू - 250 ग्रॅम

मीठ - 1 टेस्पून

काळे मीठ - 1 टेस्पून

लाल तिखट - 1 टीस्पून

गरम मसाला पावडर - 1 टीस्पून

काळी मिरी पावडर - 1 टीस्पून

जिरे पावडर - 1 टीस्पून

साखर - १ कप

कृती

प्रथम लिंबू स्वच्छ धुवून करा. लिंबाचे लोणचे बनवण्यासाठी लिंबामध्ये पाणी घाला. त्यानंतर, लिंबू 4 मिनिटे मायक्रोवेव्ह करा. तुम्हाला दिसेल की बुडबुडे बाहेर येत आहेत.  लिंबाची कडवट चव असल्याने हे पाणी काढून टाकावे.

यानंतर लोणच्याचा मसाला तयार करा. एका भांड्यात मीठ, काळे मीठ, लाल तिखट, गरम मसाला पावडर, काळी मिरी पावडर आणि जिरे पावडर एकत्र करून घ्या. लोणच्याचा मसाला भरण्यासाठी लिंबू अर्धे कापून घ्या आणि पुढील वापरासाठी लिंबाचा रस बाजूला ठेवा.

चहा गाळल्यानंतर पावडर फेकून देता? थांबा, घरातील ५ कामं सोपी करेल वापरलेली चहा पावडर

आता पुन्हा एकदा मसाल्यात मिसळलेले लिंबू ४ ते ५ मिनिटे मायक्रोवेव्हमध्ये ठेवा. नंतर मायक्रोवेव्हमधून लिंबू काढा आणि थंड होऊ द्या. तुम्हाला दिसेल की लिंबू आता खूप रसदार झाले आहेत. त्यानंतर थोडी साखर घेऊन त्यात लिंबू घाला. हे लिंबू पुन्हा एकदा एक मिनिट मायक्रोवेव्ह करा.

कांदा, लसणाशिवाय बनवा घट्ट, चविष्ट ग्रेव्ही; 4 ट्रिक्स, कमी साहित्यात स्वयंपाक होईल चवदार

नंतर, लिंबाचे लोणचे एका दिवसासाठी सेट करण्यासाठी ठेवा जेणेकरून ते सर्व चव शोषून घेईल. कोणत्याही तेलाशिवाय फक्त 10 मिनिटांत तुमचे झटपट लिंबाचे लोणचे तयार आहे. शेवटी, लिंबाचे लोणचे एका हवाबंद डब्यात ठेवा.
 

Web Title: Instant Lemon Pickle : Easy pickle recipe without oil make spicy lemon pickle without oil in just 10 minutes 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.