Join us  

तोंडी लावण्यासाठी १० मिनिटात करा लिंबाचं आंबट, गोड चटकदार लोणचं; वर्षभर टिकेल, सोपी रेसेपी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 12:35 PM

Instant Lemon Pickle : लिंबाचं लोणचं बनवायला अगदी सोपं असतं आणि वर्षभर ते टिकतं  त्यामुळे सतत बनवण्याचा त्रास नाही.

भारतीय घरातील दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात लोणचं असतंच.  डाळ भाताबरोबर किंवा चपातीबरोबर लोणचं असायलाच हवं. लोणचं नसेल तर अनेकांना जेवण अपूर्ण वाटतं. कितीही चांगला स्वयंपाक केला असला तरी काहींना ताटात लोणचं लागतंच. लिंबाचं लोणचं बनवायला अगदी सोपं असतं आणि वर्षभर ते टिकतं  त्यामुळे सतत बनवण्याचा त्रास नाही. (How to make nimbu aachar) हिवाळ्यात लिंबू बाजारात फ्रेश आणि स्वस्त मिळतात. या लिंबांचा वापर करून तुम्ही कमी वेळात फ्रेश लिंबाचं लोणचं बनवू शकता. (Lemon Pickle Recipe limbacha loncha kase banvave recipe)

साहित्य

लिंबू - 8 (250 ग्रॅम)

मोहरीचे तेल - ¼ कप

मीठ - 1.5 चमचे (30 ग्रॅम)

हळद - ½ टीस्पून

लाल तिखट - ½ टीस्पून

काळी मिरी - ½ टीस्पून

राई- ½ टीस्पून

कलोंजी - ½ टीस्पून

हिंग - २-३ चिमूटभर

1) एका भांड्यात २-३ कप पाणी उकळण्यासाठी ठेवा. पाणी उकळायला लागल्यावर गॅस मंद करा आणि लिंबू पाण्यात टाका. लिंबू 10 मिनिटे मंद आचेवर उकळू द्या. 

2) 10 मिनिटांनंतर लिंबू पाण्यातून काढून प्लेटमध्ये ठेवा आणि थंड होऊ द्या. लिंबू थंड झाल्यावर ते कापून एका भांड्यात ठेवा, बिया काढून टाका आणि वेगळ्या करा 

3) आता लिंबाच्या कापलेल्या तुकड्यांमध्ये मीठ, हळद, लाल तिखट घाला आणि सर्व साहित्य चांगले मिसळा. काळी मिरी बारीक वाटून मिक्स करा.

4) कढईत तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर गॅस मंद करा आणि गरम तेलात मोहरी  घाला. मोहरी तडतडल्यावर त्यात बडीशेप, हिंग टाका आणि गॅस बंद करा. लिंबामध्ये थोडे थोडे मसाले घालून मिक्स करावे.

5) लिंबाचे लोणचे तयार आहे. लोणचे 3-4 दिवस उन्हात राहू द्या आणि लोणचे दिवसातून 1-2 वेळा हलवा जेणेकरून मसाले लोणच्यामध्ये चांगले मिसळतील.  तुम्ही हे लोणचं लगेच खाऊ शकता. मात्र तीन-चार दिवसांत सर्व मसाला लिंबाच्या आत व्यवस्थित पोहोचतो. नेहमी कोरड्या आणि स्वच्छ चमच्याने लोणचे बाहेर काढा, हे लोणचे 1 वर्ष टिकते.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सपाककृती