Join us  

लिंबू सरबतात घाला ‘इन्स्टंट मसाला’, नेहमीचेच सरबत ऑक्टोबर हिटमध्ये देईल भरपूर एनर्जी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2023 9:20 AM

Instant Limbu Sharbat Masala: लिंबू सरबताचा इन्स्टंट मसाला...  नुसतेच सरबत पिण्याऐवजी असं काहीतरी ट्राय करा, चवीला मस्त- जास्त हेल्दी

ठळक मुद्देलिंबू सरबताचा हा इंस्टंट मसाला घरात करून ठेवा. पाहूणे आल्यावर उत्कृष्ट चवीचं लिंबू सरबत त्यांना झटपट करून देऊ शकाल.

एनर्जीचा स्वस्तात मस्त बुस्टर डोस कोणता असेल तर तो आहे लिंबू सरबत. लिंबू सरबत नुसतंच प्यायलं तरी चवीला छानच लागतं. त्यात काही वादच नाही. पण जर त्याची चव आणि त्याच्यातले पौष्टिक घटक या दोन्ही गोष्टी आणखी जास्त वाढवायच्या असतील तर लिंबू सरबताचा हा इंस्टंट मसाला घरात करून ठेवा. पाहूणे आल्यावर उत्कृष्ट चवीचं लिंबू सरबत त्यांना झटपट करून देऊ शकाल (How to make limbu sarbat more healthy and tasty?). कारण लिंबाचा रस आणि पाणी एकत्र करून त्यात फक्त चमचाभर मसाला टाकला की झालं भन्नाट चवीचं लिंबू सरबत तयार (limbu sarbat recipe)...

 

लिंबू सरबत मसाला रेसिपी

साहित्य

२ टेबलस्पून भाजलेल्या जिऱ्यांची पूड

२ टेबलस्पून न भाजलेल्या जिऱ्यांची पूड

१ टेबलस्पून मीरे पूड

पिस्ते खाण्याचे ७ फायदे, हृदयापासून बीपीपर्यंत... सगळंच राहील ठणठणीत

१ टेबलस्पून सुंठ पावडर

१०० ग्रॅम खडीसारख

१ टेबलस्पून काळं मीठ

१ टेबलस्पून सैंधव मीठ

 

रेसिपी

२ टेबलस्पून जीरे भाजून त्याची पावडर तयार करा आणि काही जीरे न भाजताच त्याची पावडर तयार करा.

त्यानंतर वरील सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाका आणि त्याची बारीक पावडर तयार करून घ्या.

गरबा खेळताना थकवा येऊ नये म्हणून खाण्यापिण्याची ही ३ पथ्यं पाळा, मग नाचा बिनधास्त रात्रभर

एक ग्लासभरून पाणी घ्या. त्यात अर्धे लिंबू पिळा. लहान आकाराचे लिंबू असेल तर १ घेतले तरी चालेल.

आता त्या लिंबूपाण्यात आपण तयार केलेला लिंबू मसाला १ टेबलस्पून घाला.

सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घेतलं की झालं झकास चवीचं आणि सुपरहेल्दी असलेलं लिंबू सरबत तयार...

गरबा- दांडियासाठी जॅकेट घ्यायचंय? फक्त ३०० रुपयांत घ्या एकापेक्षा एक ट्रेण्डी- स्टायलिश जॅकेट

हा मसाला तुम्ही महिनाभर तरी साठवून ठेवू शकता. 

ही रेसिपी kidzapzoe या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. 

 

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्सआहार योजना