Lokmat Sakhi >Food > डोसा खायचाय पण पीठ भिजवायला, वाटायला वेळच नाही? १५ मिनीटांत करा इंन्स्टंट मसाला डोसा, घ्या रेसिपी

डोसा खायचाय पण पीठ भिजवायला, वाटायला वेळच नाही? १५ मिनीटांत करा इंन्स्टंट मसाला डोसा, घ्या रेसिपी

Instant Masla Dosa Recipe : दिवाळीमुळे जास्तीच्या कामात व्यस्त असाल तर करा झटपट-चविष्ट जेवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2023 12:58 PM2023-11-03T12:58:16+5:302023-11-03T13:08:26+5:30

Instant Masla Dosa Recipe : दिवाळीमुळे जास्तीच्या कामात व्यस्त असाल तर करा झटपट-चविष्ट जेवण

Instant Masla Dosa Recipe : Don't have time to make the dosa batter? Make instant masala dosa in 15 minutes, get the recipe | डोसा खायचाय पण पीठ भिजवायला, वाटायला वेळच नाही? १५ मिनीटांत करा इंन्स्टंट मसाला डोसा, घ्या रेसिपी

डोसा खायचाय पण पीठ भिजवायला, वाटायला वेळच नाही? १५ मिनीटांत करा इंन्स्टंट मसाला डोसा, घ्या रेसिपी

सध्या दिवाळीची साफसफाई, खरेदी, फराळाचे पदार्थ असे करुन आपण थकत असणार. त्यात पूर्ण स्वयंपाक करण्यापेक्षा असा झटपट होणारा पौष्टीक आणि तरीही सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ केला तर विकेंडची रंगत नक्कीच वाढू शकते. आधीच आपल्याला रोज सतत पोळी, भाजी, भात आमटी आणि तेच ते खाऊन आपल्याला कंटाळा येतो. नाश्त्याला तर बरेचदा पोहे, उपमा, फोडणीची पोळी नाहीतर फोडणीचा भात हे ठरलेले पदार्थ असतात. अशावेळी विकेंडला तरी काहीतरी वेगळं खावं असं आपल्याला वाटतं. मग साहजिकच बाहेर जाऊन खायचा प्लॅन केला जातो. पण बाहेरचे खाण्यापेक्षा झटपट असे घरीच काही केले तर. आता साऊथ इंडीयन पदार्थ करायचे म्हटल्यावर त्यासाठी डाळ-तांदूळ भिजत घालणे, ते वाटून आंबवणे ही सगळी प्रक्रिया आली. पण हे सगळे न करताही अगदी झटपट असा डोसा करता आला तर मस्तच नाही का? पाहूयात इंन्स्टंट असा हा मसाला डोसा तयार करण्याची सोपी रेसिपी (Instant Masla Dosa Recipe)...

१. साधारण १ वाटी बेसन पीठ, पाव वाटी तांदळाचे पीठ आणि पाव वाटी रवा एका बाऊलमध्ये घ्यायचे. 

२. यामध्ये पाव ते अर्धी वाटी दही, चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण एकजीव करायचे, अंदाजे पाणी घालून हे मिश्रण चांगले पातळसर करुन घ्यायचे. 

३. साधारणपणे १५ मिनीटे हे पीठ झाकून ठेवावे आणि त्यानंतर अर्धा चमचा इनो किंवा बेकींग सोडा घालून हे मिश्रण पुन्हा एकजीव करावे. 

४. मुलं भाज्या खात नसतील तर यामध्ये गाजर, बीट, शिमला मिरची, कोबी यांसारख्या भाज्याही घालून शकतो.

५. तसेच आवडीप्रमाणे आलं-मिरची-लसूण पेस्ट, तिखट असे काहीही घातले तरी चालते. 

६. तव्यावर तेल किंवा तूप घालून त्यावर पातळ असा डोसा घातला तर तो अतिशय झटपट आणि कुरकुरीत निघतो. 

७. या डोशासोबत आवडीप्रमाणे खोबऱ्याची हिरवी चटणी, दाण्याची लाल चटणी आणि बटाट्याची डोसा भाजी केल्यास डोशाची रंगत आणखी वाढते.    

Web Title: Instant Masla Dosa Recipe : Don't have time to make the dosa batter? Make instant masala dosa in 15 minutes, get the recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.