Join us  

ना डाळ भिजवण्याचं टेन्शन, ना आंबवण्याचा त्रास, करून पाहा मसूर डाळीचा पौष्टीक डोसा झटपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2023 12:56 PM

Instant Masoor Dosa No soaking, No boiling, No fermentation required : वजन कमी करतानाही पौष्टिक खायचं तर हा रुचकर डोसा करुन पाहा.

नाश्त्याला अनेकांना साऊथ इंडियन पदार्थ खायला आवडतात. डोसा, मेदू वडा, इडली, आप्पे हे पदार्थ आवडीने खाल्ले जातात. पण हे पदार्थ करण्याची प्रोसेस खूप मोठी आहे. डाळ-तांदूळ भिजत घालण्यापासून ते आंबवण्यापर्यंत खूप वेळ जातो. पण अनेकदा डोसा खाण्याची इच्छा होते. जर आपल्याला देखील डोसा खाण्याची इच्छा झाली असेल, पण डाळ-तांदूळ भिजत घातलं नसेल तर, मसूर डाळीचा डोसा करून पाहा.

मसूर डाळ खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. मसूर डाळीची आमटी, भाजी आपण खाल्लीच असेल, पण कधी डोसा करून पाहिलं आहे का? यासाठी डाळ भिजत घालण्याची गरज नाही, किंवा आंबवण्याचीही गरज नाही. मसूर डाळीचा डोसा कसा तयार करायचा पाहूयात(Instant Masoor Dosa No soaking, No boiling, No fermentation required!).

मसूर डाळीचा डोसा करण्यासाठी लागणारं साहित्य

मसूर डाळ

गाजर

लसूण

लाल सुक्या मिरच्या

शिळी चपाती आणि उकडलेला बटाटा, ‘असा’ क्रिस्पी-कुरकुरीत चपाती रोल, चमचमीत रेसिपी

पाणी

मीठ

तेल

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये २ कप मसूर डाळ घ्या, त्यात पाणी घालून डाळ स्वच्छ धुवून घ्या. नंतर त्यात गाजराचे तुकडे, ५ ते ६ लसणाच्या पाकळ्या, ३ ते ४ लाल सुक्या मिरच्या व गरजेनुसार पाणी घाला. त्यानंतर सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या, व त्याची गुळगुळीत पेस्ट तयार करून घ्या.

कमी तेल पिणारे हिरव्या मुगडाळीचे मेदूवडे करण्याची सोपी रेसिपी, उडीद डाळीपेक्षा पचायलाही हलके आणि पौष्टिक

तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात थोडं पाणी आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. नॉन स्टिक पॅन गरम करण्यासाठी ठेवा. त्यावर ब्रशने तेल लावून ग्रीस करा. चमच्याने डोश्याचं बॅटर घ्या, व गोलाकार फिरवून डोसा तयार करा. चमच्याने डोश्यावर तेल घालून, दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या. अशा प्रकारे मसूर डाळीचा डोसा खाण्यासाठी रेडी. जर आपण वेट लॉस करत असाल तर, आहारात मसूर डाळीचा डोसा अॅड करा.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स