साऊथ इंडियन डिशेस कोणाला नाही आवडत. नाश्त्यासाठी इडली, डोसा, मेदू वडा, अप्पे, या रेसिपी हमखास केले जातात. पण या सगळ्यात मेदू वडा हा पदार्थ अनेकांना आवडतो. मेदू वडा करण्यासाठी डाळ भिजत घालून, त्याची पेस्ट तयार केली जाते. त्यानंतर मेदू वडा तयार होतो. मेदू वडा बनवायला खूप मेहनत घ्यावी लागते.
योग्य प्रमाणात साहित्य घेतल्यास हा पदार्थ परफेक्ट बनतो, नाहीतर बिघडतो. कधी - कधी मेदू वड्याचा आकार बिघडतो. घरी हॉटेल - स्टाईल मेदू वडे तयार होत नाही. जर आपल्याला डाळ भिजत न घालता मेदू वडे करायचे असतील तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहा. डाळी ऐवजी आपण ब्रेडचा वापर करू शकता. ब्रेड मेदू वडा ही रेसिपी घरच्या साहित्यात - झटपट तयार होते. चला तर मग या क्रिस्पी पदार्थाची कृती पाहूयात(instant medu vada with leftover bread slices).
ब्रेड मेदू वडा करण्यासाठी लागणारं साहित्य
मॅश केलेले बटाटे
ब्रेड
रवा
तांदळाचे पीठ
दही
साऊथ इंडियन लालेलाल चविष्ट ‘अल्लम चटणी’ आता करा घरी, डोशाची वाढेल रंगत..चव अशी की वाह!
जिरं
आलं - लसूण पेस्ट
लाल तिखट
मीठ
काळी मिरी पूड
तेल
ब्रेड मेदू वडा करण्यासाठी लागणारं साहित्य
ब्रेड मेदू वडा करण्यासाठी एका वाटीत मॅश केलेले बटाटे, ब्रेडचे तुकडे, रवा, तांदळाचे पीठ, दही, जिरे, आलं - लसूण पेस्ट, लाल तिखट, मीठ आणि चवीनुसार काळी मिरी घालून मिश्रण एकजीव करा.
‘बाँबे चटणी’ खाल्लीच नसेल तर काय मजा? २ चमचे पिठात होते झटपट चविष्ट चटणी
साहित्य मिक्स केल्यानंतर हाताला थोडे तेल लावा, मिश्रणाचा एक गोळा घ्या. या मिश्रणाला मेदू वड्याचा आकार द्या. दुसरीकडे कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात वडे घालून सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. वडे तळून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून ठेवा. अशा प्रकारे ब्रेड मेदू वडा खाण्यासाठी रेडी.