हिरव्यागार मिरच्यांमध्ये एक वेगळाच खमंगपणा असतो. त्यामुळेच तर ज्या भाज्यांमध्ये ताजी हिरवी मिरची टाकलेली असते, ती भाजी लाल तिखट घालून केलेल्या भाजीपेक्षा निश्चितच अधिक चवदार लागते. मिरचीच्या ठेच्यामध्ये असणारा खमंग झणझणीतपणाही असाच.. म्हणूनच तर जेवणात ठेचा असेल तर त्या जेवणाची चव आणखी खुलते यात वादच नाही. आता ठेच्याप्रमाणेच हिरव्यागार मिरचीचं झणझणीत लोणचं (tasty delicius green chilli pickle) करून बघा. तोंडाला चव आणणारं हे लोणचं (Instant Mirchi pickle) करायलाही अगदीच सोपं आहे. बघा ही रेसिपी..
कसं करायचं मिरचीचं लोणचं?mygardenofrecipes या इन्स्टाग्राम पेजवर ही रेसिपी शेअर करण्यात आली आहे.साहित्य१०० ग्रॅम हिरव्या मिरच्या१ टेबलस्पून बडिशेप
प्रवासात असताना झटपट वर्कआऊट कसं करायचं? वाचा आलिया भटच्या फिटनेस ट्रेनरचा खास सल्ला१ टेबलस्पून मोहरी१ टी स्पून जिरे १ टी स्पून ओवापाव टीस्पून हळदचवीनुसार लाल तिखट आणि मीठअर्धा टीस्पून कलुंजीअर्धा कप तेल
कृती१. मिरच्या स्वच्छ धुवून अगदी कोरड्या होईपर्यंत वाळवून घ्या. त्यानंतर त्याची देठं काढून टाका आणि मधोमध त्या उभ्या कापून घ्या.
२. बडिशेप, मोहरी, जिरे आणि ओवा कढईमध्ये टाकून २ ते ३ मिनिटे मंद आचेवर भाजून घ्या. त्यानंतर थंड झाले की मिक्सरमध्ये फिरवून त्याची बारीक पावडर करून घ्या.
"आ जाने जा...." म्हणत आजी- आजोबांनी केला रोमॅण्टिक डान्स, बघा व्हायरल व्हिडिओ
३. उभ्या कापलेल्या हिरव्या मिरच्या एका भांड्यात घ्या. त्यात हळद, कलुंजी, लाल तिखट, मीठ आणि आपण केलेली मसाल्याची पावडर टाका.
४. त्यानंतर तेल थोडंसं तापवून घ्या आणि थंड झालं की ते ही मिरच्यांमध्ये टाका.
५. सगळं मिश्रण एकदा व्यवस्थित हलवून घ्या आणि हवाबंद काचेच्या बरणीत भरून ठेवा.
६. एका महिन्यापर्यंत हे लोणचं चांगलं टिकतं.
७. आवडत असल्यास लोणच्यात थोडा लिंबाचा रस घातला तरी चालेल.